फोटो सौजन्य: Social Media
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. हीच मागणी पाहता अनेक ऑटो कंपन्या, मार्केटमध्ये इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि कार ऑफर करत असतात. सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीस प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध योजना ऑफर करत आहे.
आता रस्त्यांवर इलेक्ट्रिक ऑटो देखील दिसू लागल्या आहेत. नुकतेच Montra इलेक्ट्रिकने भारतात त्यांची नवीन इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर सुपर कार्गो लाँच केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने ही ऑटो आणली आहे. ती उत्तम रेंज, ताकद आणि परवडणाऱ्या किमतीसह लाँच करण्यात आली आहे.
2 लाखाचं Down Payment आणि Maruti Grand Vitara CNG झटक्यात होईल तुमची, असा असेल EMI?
या इलेक्ट्रिक ऑटोमध्ये 170 क्यूबिक फूट, 140 क्यूबिक फूट आणि ट्रे डेक अशा तीन व्हेरिएंटमध्ये आणण्यात आली आहे. चला जाणून घेऊया इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर सुपर कार्गो भारतात कोणत्या फीचर्स आणि किंमतीसह लाँच करण्यात आली आहे?
सुपर कार्गो अनेक उत्तम फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे, ज्यामुळे ही ऑटो इतर तीन चाकी वाहनांपेक्षा वेगळी ठरते. यात 13.8 किलोवॅट क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी आहे, जी 11 किलोवॅट पीक पॉवर आणि 70 NM टॉर्क जनरेट करते. पूर्ण चार्ज केल्यानंतर 200 किमी पेक्षा जास्त प्रमाणित रेंज आणि प्रत्यक्ष वापरात 170 किमीची रेंज देते. 15 मिनिटांत ही ऑटो 100 टक्के चार्ज होते.
यात बोरॉन स्टील चेसिस आहे, ज्यामुळे ही ऑटो टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकते. या ऑटोचे एकूण वजन क्षमता 1.2 टन आहे, ज्यामुळे ते जड वस्तू वाहून नेण्यास देखील
लाँच होण्याअगोदरच Toyota Land Cruiser Prado J250 ची जोरदार हवा, असे असेल डिझाइन आणि फीचर्स
ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या सेफ्टीसाठी यात अनेक उत्तम फीचर्स आहेत. यात फ्रंट डिस्क ब्रेक, हिल-होल्ड फंक्शन, रिव्हर्सिंगच्या सोयीसाठी रिव्हर्स असिस्ट आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आहे. यात 23% ग्रेडॅबिलिटी आहे, म्हणजेच तुम्ही खडबडीत रस्त्यांवरही ही ऑटो सहजपणे चालवू शकता.
सुपर कार्गोची एक्स-शोरूम किंमत 4.37 लाख रुपयांपासून सुरू होते. या किमतीत सबसिडी देखील समाविष्ट आहे. तसेच, यांच्या खरेदीवर 5 वर्षांची किंवा 1.75 लाख किमीची बॅटरी वॉरंटी दिली जात आहे.