फोटो सौजन्य: iStock
भारतात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यात सर्वात जास्त बजेट फ्रेंडली कार्सची विक्री होत असते. मात्र, देशात अनेक असे लोकं आहेत ज्यांच्याकडे आलिशान कार्स असतात. कित्येक राजकारणी, सेलिब्रेटी आणि उद्योगपती कोटींची किंमत असणाऱ्या कार्समधून प्रवास करत असतात. या कार्समध्ये मर्सिडीज, BMW, Ferrari आणि अशा अनेक लक्झरी ब्रँड्सचा समावेश आहे.
भारतातील उद्योगपतींबद्दल जेव्हा चर्चा होते, तेव्हा आपसूकच मुकेश अंबानींचे नाव आपल्या ध्यानात येते. अंबानी कुटुंबीयांकडे सुद्धा अनेक लक्झरी आणि आलिशान कार्स पाहायला मिळतात, विशेषकरून Rolls Royce च्या कार्स.
भारतात रोल्स-रॉइस कार खूप लोकप्रिय होत आहेत. या ब्रँडच्या कारची किंमत इतकी जास्त आहे की त्या खरेदी करणे सामान्य माणसाच्या बजेटबाहेर असते. सध्या भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक रोल्स-रॉइस कार आहेत. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीकडे Rolls-Royce Drophead आहे. या आलिशान कारची किंमत तब्बल 10 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे नक्कीच या कारच्या किमतीत एक-दोन नाही तर अनेक बंगले खरेदी करता येतील.
रोल्स-रॉइस ड्रॉपहेड ही फॅन्टमचे कन्व्हर्टिबल व्हर्जन आहे. ही कार बरीच मोठी आहे. रस्त्यावरील अनेक कार्समध्ये ती एक वेगळी ओळख निर्माण करते. या कारच्या आकारामुळे, ती एकदा चालवणे देखील मोठी गोष्ट आहे. या कारमध्ये मोठे ग्रिल आणि रोल्स-रॉइस मॅस्कॉट हे तिला वेगळे दाखवण्यासाठी पुरेसे आहे, परंतु याचा डेक आणि बोटीसारखे इंटिरिअर या कारला महागड्या क्लबचा भाग बनवते.
रोल्स-रॉइस ड्रॉपहेडच्या इंटिरिअरमध्ये फारसे गॅझेट्स नाहीत, ज्यामुळे ती सोप्या पद्धतीने चालवता येते. या कारमध्ये V12 इंजिन बसवण्यात आले आहे. या कारच्या राइड क्वालिटीबद्दल बोलायचे झाले तर ती एकदम आरामदायक आहे. ही कार फक्त रुंद रस्त्यावरच चालवता येते. सध्या ही रोल्स-रॉइस कार भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाही.
ग्लोबल मार्केटमध्ये ‘या’ Powerful Bike चा नुसता टेरर ! भारतात किंमत 22.5 लाखांवर
मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी हा अनेकदा ही कार चालवताना दिसतो. गेल्या काही महिन्यांत आकाशची बहीण ईशा अंबानी त्याच्यासोबत कारच्या पुढच्या सीटवर बसली होती. आकाशची पत्नी श्लोका अंबानी कारच्या मागच्या सीटवर बसून राईडचा आनंद घेत असल्याचे दिसून आले.