Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TAFE कडून ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा’ सीझन 3 ची घोषणा; शेती नवकल्पनांसाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ

Tractors and Farm Equipment Limited ने ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा 2026 चे आयोजन केले आहे. हे या स्पर्धेचा तिसरा सिझन आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 05, 2026 | 04:06 PM
भारतभरातील शेतीविषयक नवकल्पना शोधण्यासाठी TAFE द्वारा ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा’ सीझन ३ ची सुरुवात

भारतभरातील शेतीविषयक नवकल्पना शोधण्यासाठी TAFE द्वारा ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा’ सीझन ३ ची सुरुवात

Follow Us
Follow Us:
  • ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी एका खास स्पर्धेचे आयोजन
  • ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा’ सीझन 3 ची घोषणा
  • आकर्षक रोख बक्षिसे जिंकण्याची संधी
भारतातील शेती क्षेत्रातील नवकल्पना आणि ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी TAFE (Tractors and Farm Equipment Limited) ने ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा २०२६ – #SabseBadeAllrounder Ki Talaash’ च्या सीझन ३ ची अधिकृत घोषणा केली आहे. दोन यशस्वी पर्वांनंतर सुरू होणारा हा सीझन आतापर्यंतचा सर्वात मोठा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ही स्पर्धा शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि ग्रामीण भागातील परिवर्तनकर्त्यांसाठी एक राष्ट्रीय नवकल्पना मंच म्हणून कार्य करणार आहे. मॅसे फर्ग्युसन ट्रॅक्टरवर आधारित नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देत, शेती, संलग्न उद्योग आणि ग्रामीण व्यवसायांमध्ये नवे उपाय शोधण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे.

Electric Cars च्या मागणीत ‘छप्परफाड़’ मागणी! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top 5 वाहनांनी अख्ख मार्केट हलवलंय

TAFE कडून सांगण्यात आले की, सीझन ३ मध्ये कोणत्याही मॅसे फर्ग्युसन ट्रॅक्टरवर आधारित कल्पना सादर करता येणार आहेत. यामुळे सहभागींसाठी संधींची व्याप्ती अधिक वाढणार आहे. निवड झालेल्या सहभागींना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल तसेच TAFE चे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगतज्ज्ञ असलेल्या तज्ज्ञ समितीसमोर आपली संकल्पना सादर करण्याची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्याला सुमारे ₹८.२ लाख किमतीचा मॅसे फर्ग्युसन २५४ डायनास्मार्ट ट्रॅक्टर देण्यात येणार असून, याशिवाय आकर्षक रोख बक्षिसेही दिली जाणार आहेत.

सहभागी ऑनलाइन नोंदणी करून आपले विचार व्हिडिओ किंवा मजकूर स्वरूपात इंग्रजी किंवा कोणत्याही भारतीय प्रादेशिक भाषेत सादर करू शकतात. सादर करण्यात येणाऱ्या कल्पनांमध्ये मॅसे फर्ग्युसन ट्रॅक्टरचा व्यावहारिक उपयोग दाखवणे आवश्यक आहे, ज्यामुळे शेती सुधारणा, नवी व्यावसायिक संधी किंवा सकारात्मक सामाजिक-आर्थिक बदल साध्य होतील.

अपडेटेड Suzuki Access झाली लाँच! आता ‘या’ सेफ्टी फिचरमुळे तुमचा प्रवास होईल अधिकच सुरक्षित, किंमत…

ही स्पर्धा १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइटवर भेट देता येईल.

TAFE ने सांगितले की, आधुनिक शेती, शाश्वतता आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, मॅसे डायनास्टार सीझन ३ नवप्रवर्तकांसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे.

Web Title: Tafe announces massey dynastar competition season 3 national platform for agricultural innovations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Farming

संबंधित बातम्या

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे
1

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!
2

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!

Tata Avinya: टाटाची सर्वात भारी इलेक्ट्रिक कार आता नव्या डिझाईनसह येणार!
3

Tata Avinya: टाटाची सर्वात भारी इलेक्ट्रिक कार आता नव्या डिझाईनसह येणार!

नव्या हायब्रिड सिस्टीमसह आणि हाय-टेक फीचर्ससह 2027 Hyundai Elantra चे अनावरण!
4

नव्या हायब्रिड सिस्टीमसह आणि हाय-टेक फीचर्ससह 2027 Hyundai Elantra चे अनावरण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.