फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केट सोबतच ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा पॉवरफुल बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. या पॉवरफुल लूकमध्ये तर दमदार असतातच पण यासोबतच त्या परफॉर्मन्सच्या बाबतीत सुद्धा धमाकेदार असतात. अनेक तरुणाचे तर स्वप्न असते की त्यांच्याकडे पॉवरफुल बाईक असावी.
2026 Triumph Rocket 3 सिरीजमधील R आणि GT व्हेरिएंट्स ग्लोबली उत्तम स्टायलिंग आणि नवीन कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आले आहेत. या बाईक्सची एक्स-शोरूम किंमत भारतात सुमारे 22.5 लाख रुपये (R व्हेरिएंट) आणि 23 लाख रुपये (GT व्हेरिएंट) असण्याची अपेक्षा आहे. खरं तर, नवीन मॉडेल वर्षात (MY26) कोणतेही यांत्रिक बदल करण्यात आलेले नाहीत, परंतु त्यांचे लूक पूर्णपणे रिफ्रेश करण्यात आले आहेत.
50 हजार पगार असणारे सुद्धा सहज घेईल Kia Seltos SUV, ‘एवढा’ असेल EMI
2026 Triumph Rocket 3 Storm R व्हेरिएंट सॅटिन बाजा ऑरेंज आणि मॅट सॅफायर ब्लॅक या दोन-टोन कलरसोबत उपलब्ध आहे, ज्यामध्ये सिल्व्हर कोचलाइन असल्याने या बाईक आणखी स्पोर्टी दिसत आहे. याशिवाय, इतर कलर ऑप्शन्समध्ये कार्निवल रेड, सॅटिन पॅसिफिक ब्लू आणि ग्रॅनाइट यांचा समावेश आहे, जे सॅफायर ब्लॅकसह जोडलेले आहेत.
रॉकेट 3 स्टॉर्म GT व्हेरिएंट देखील पूर्णपणे अपडेट करण्यात आला आहे. त्यात सॅटिन ग्रॅनाइट आणि मॅट सॅफायर ब्लॅकचे कॉम्बिनेशन आहे, तसेच कोरोसी रेड कोचलाइन देखील आहे जे याला एका उत्कृष्ट टूरिंग बाईकचा लूक देतात. बाईकचा फ्लायस्क्रीन, मडगार्ड, हेडलाइट बाउल, रेडिएटर काऊल आणि साइड पॅनेल सॅफायर ब्लॅक रंगात रंगवले गेले आहेत, जे या बाईकचा लूक अजूनच आकर्षक करतात.
Triumph Rocket 3 Storm ही अजूनही जगातील सर्वात मोठी प्रोडक्शन इंजिन बाईक आहे. यात 2,458cc इनलाइन 3-सिलेंडर इंजिन आहे, जे 6-स्पीड गिअरबॉक्ससह येते. हे इंजिन 7,000 आरपीएमवर 180 बीएचपी पॉवर आणि 4,000 आरपीएमवर 225 एनएम टॉर्क जनरेट करते, जे या बाईकला रॉकेटसारखी स्पीड देते.
HSRP Number Plate अजून नाही बसवलीत? ‘या’ तारखेनंतर नंबर प्लेट बसवल्यास भरावा लागेल दंड
2026 Triumph Rocket 3 Storm च्या R आणि GT व्हेरिएंटमध्ये फुल-कलर टीएफटी डिस्प्ले आहे, जो ब्लूटूथ, नेव्हिगेशन, कॉल आणि म्युझिक कंट्रोलला सपोर्ट करतो. यात राईड डेटा ॲनालिटिक्स देखील आहे. बाईकमध्ये कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट सारखी सेफ्टी फीचर्स आहेत. रोड, रेन, स्पोर्ट आणि कस्टम या चार रायडिंग मोड्ससह रायडर्सच्या रायडिंगचा अनुभव वाढवण्यात आला आहे. जीटी व्हेरिएंट विशेषतः टूरिंगसाठी बनवण्यात आला आहे, जो ग्रिप आणि आरामदायी एर्गोनॉमिक्स देतो.