Acko चा महत्वाचा अहवाल
भारतामधील आघाडीच्या इंश्युरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲकोने आपला पहिला चलान अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल डिसेंबर 2024 ते जून 2025 या कालावधीत गोळा करण्यात आलेल्या लाखो डेटा पॉइंट्सवर आधारित असून, देशातील सर्वात सामान्य वाहतूक उल्लंघनांचा उलगडा करतो. या निष्कर्षांमधून असे स्पष्ट झाले की, असुरक्षित ड्रायव्हिंग सवयी आजही मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत आणि त्यामुळे वाहनचालकांच्या तसेच प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो.
या अहवालानुसार भारतात सर्वाधिक उल्लंघनाचे प्रमाण हेल्मेट न घालण्याचे आहे. संशोधन कालावधीतच 10.5 दशलक्ष पेक्षा अधिक हेल्मेट-संबंधित गुन्ह्यांची नोंद झाली. चिंताजनक बाब म्हणजे, प्रत्येक तीनपैकी एक राइडर अजूनही हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना दिसतो. जारी केलेल्या सर्व चलानांपैकी या उल्लंघनाचे प्रमाण तब्बल 34.8% इतके आहे.
Hero च्या ‘या’ दमदार बाईकमध्ये मिळणार क्रूज कंट्रोल, मिळणार धमाकेदार फीचर्स
अहवालात भारतातील प्रमुख शहरांतील वाहनचालकांची सविस्तर माहिती समोर आली आहे.
पुन्हा-पुन्हा चलान भरणारे: बेंगळुरू अव्वल, येथे 10.8% वापरकर्त्यांचे 10 पेक्षा जास्त चलान प्रलंबित आहेत. त्यानंतर चेन्नई (8.1%), दिल्ली (5.7%), मुंबई (4.8%) यांचा क्रम लागतो.
चलान तपासणी: चेन्नईतील ड्रायव्हर्स महिन्यात सरासरी 5 वेळा चलान तपासतात. बेंगळुरू (4.12), कोलकाता (3.29), अहमदाबाद (2.85) हे शहरं त्यानंतर.
उच्च घटना दर: दिल्ली अव्वल असून, येथे 73% वापरकर्त्यांना किमान एक चलान आहे. चेन्नई (64%), मुंबई (62%), बेंगळुरू (61%) यामध्ये पुढे आहेत.
डिजिटल अंमलबजावणी: कॅमेरे आणि मोबाइल डिव्हाइसच्या मदतीने दिलेल्या 23% डिजिटल चलानांसह बेंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे.
शोरूमसारखी चकचकीत बाईक हवी आहे? रोजच्या ‘या’ चुका टाळा आणि फॉलो करा ‘या’ टिप्स
बेंगळुरूमध्ये एका युजरवर तब्बल 89 चलान नोंदवले गेले आहे, ज्यांची एकूण रक्कम 44,500 रुपये होती. दिल्लीतील एका व्यक्तीकडे 19 चलान, अहमदाबाद व चेन्नईत 18-18 चलान नोंदले गेले. सर्वाधिक दंड भरणाऱ्यांमध्ये दिल्ली पुन्हा अव्वल ठरली. येथे एका ड्रायव्हरने फक्त 5 चलानांसाठी तब्बल 61,000 रुपये दंड भरला.
ॲको मोटर इन्शुरन्सचे उपाध्यक्ष मयंक गुप्ता यांनी सांगितले, “प्रत्येक चलान हा केवळ दंड नाही, तर जबाबदारीने वाहन चालवण्याची जाणीव करून देणारा संदेश आहे. आम्ही आमच्या ॲपमध्ये चलान तपासणीची सोय उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे युझर्सना जागरूक राहणे आणि सुरक्षित ड्रायव्हिंगकडे लक्ष देणे सोपे होईल.”
या अहवालाद्वारे ॲकोचा उद्देश भारतात वाहतूक सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करणे आणि जबाबदारीने ड्रायव्हिंगची सवय लावणे हा आहे. जबाबदार वर्तनामुळे केवळ अपघातच टाळता येत नाहीत, तर कुटुंबांचे संरक्षण होते.