फोटो सौजन्य: iStock
Jaguar Type 00 Preview Event Cancelled: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-171 उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते. या विमान दुर्घटनेत तब्बल 265 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात विद्यार्थी डॉक्टर आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा समावेश आहे. या दुःखद घटनेनंतर, संपूर्ण देश शोक व्यक्त करीत आहे. तसेच, अनेक मोठमोठे इव्हेंट देखील पुढे ढकलण्यात आले आहे. या दुःखद घटनेमुळे, जग्वार लँड रोव्हरने येत्या 14 जून 2025 रोजी मुंबईत होणारा त्यांचा Jaguar Type 00 प्रिव्ह्यू कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा कार्यक्रम ब्रँडच्या जागतिक दौऱ्याचा भाग होता, ज्या अंतर्गत भारतात Jaguar Type 00 कॉन्सेप्ट मॉडेल सादर केले जाणार होते. यापूर्वी हे मॉडेल मोनाको, म्युनिक आणि टोकियोमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे.
जग्वार लँड रोव्हरच्या प्रतिनिधीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “आज सकाळी एअर इंडियाच्या विमान AI-171 च्या दुःखद अपघातामुळे, आम्ही शनिवारी, 14 जून रोजी मुंबईत होणारा टाइप 00 कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या भयानक अपघातामुळे प्रभावित झालेल्या सर्व कुटुंबियांसह आणि प्रियजनांसोबत आमच्या संवेदना आहेत.”
Jaguar Type 00 ही जग्वार इलेक्ट्रिक आर्किटेक्चर (JEA) प्लॅटफॉर्मवर बनवलेली एक फ्यूचरिस्टिक इलेक्ट्रिक कार आहे आणि ती कंपनीच्या नेट झिरो मिशनच्या दिशेने एक उत्तम पाऊल मानले जात आहे.
या कॉन्सेप्ट कारचे ’00’ नाव शून्य उत्सर्जन आणि तांत्रिक बदल दर्शवते. याचे डिझाइन अतिशय आधुनिक आहे, ज्यामध्ये सुपर-लांब बोनेट, टॅपर्ड रूफलाइन आणि फ्लॅट बूटलिडचा समावेश आहे. हे GT EV संकल्पनेने प्रेरित 4-दरवाज्यांचे मॉडेल असण्याची शक्यता आहे आणि 770 किमीच्या WLTP रेंज आणि अल्ट्रा-फास्ट DC चार्जिंगसह (जे 15 मिनिटांत 321 किमी चार्ज ) दिले जाऊ शकते.
यंदाच्या Festive Season मध्ये Skoda Octavia RS होणार लाँच, ‘एवढी’ असू शकते किंमत?
Jaguar Type 00 यापूर्वी मोनाको, म्युनिक आणि टोकियो सारख्या शहरांमध्ये सादर केले गेले आहे आणि भारत त्याच्या जागतिक EV टूरचा भाग होणार होता. भविष्यातील योजनांचा भाग म्हणून, जग्वार 2025 च्या अखेरीस ही ४-डोअर GT बाजारात आणू शकते. त्यानंतर कंपनीची लहान आणि परवडणारी इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याची योजना आहे. कंपनी हळूहळू संपूर्ण ईव्ही ब्रँड बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.