फोटो सौजन्य: @Fullthr4ttle (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट हे नेहमीच विदेशातील ऑटो कंपन्यांना खुणावत असते. येथे वाहनांसाठी असणारी मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच मागणीमुळे देशात अनेक ऑटो कंपन्या विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. आता लवकरच स्कोडा कंपनी मार्केटमध्ये नवीन कार लाँच करणार आहे.
Skoda Octavia RS लवकरच भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. कंपनीने स्वतःहूनच याची पुष्टी केली आहे. सध्यातरी या कारची लाँचिंगची नेमकी वेळ सांगण्यात आलेली नाही, परंतु ही 2025 च्या फेस्टिव्ह सिझनमध्ये लाँच केली जाऊ शकते. स्कोडाची ही कार अनेक उत्तम फीचर्ससह येते, जी लोकांना लक्झरी फील देखील देते. चला जाणून घेऊया Skoda Octavia RS भारतात कोणत्या फीचर्ससह लाँच केली जाऊ शकते?
जर ‘इतका’ असेल पगार, तर झटक्यात घ्याल Toyota Innova Hycross कार
Skoda Octavia RS भारतात कम्प्लीटली बिल्ट युनिट (CBU) म्हणून आणले जाईल. त्याचे मर्यादित युनिट्स आणले जातील. ही कार ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सादर करण्यात आली होती, आता ही कार 2025 च्या फेस्टिव्ह सिझनमध्ये लाँच केली जाणार आहे. मात्र, सीबीयू असल्याने या कारची किंमत ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते.
या कारमध्ये 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 265 एचपी पॉवर जनरेट करते, जे नुकत्याच लाँच झालेल्या Volkswagen Golf GTI मध्ये दिसून आले होते. याचे इंजिन एक स्पोर्टी आणि उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते.
लवकरच लाँच होणार नवीन Royal Enfield Himalayan 750, मिळणार दमदार फीचर्स
Octavia RS जरी लवकरच लाँच होत असली तरी, कंपनीच्या इतर वाहनांचे लाँचिंग सध्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. या यादीत कोडियाक आरएस, सुपर्ब आणि अगदी रेग्युलर ऑक्टाव्हियाचाही समावेश आहे. स्कोडा इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांनी ऑटोकारशी बोलताना याबद्दल सांगितले. ते म्हणाले की, FTA (फ्री ट्रेंड अॅग्रीमेंट), आणि नवीन धोरणांमुळे हे निर्णय पुढे ढकलण्यात आले आहेत. ते म्हणाले, “एफटीए करार, नवीन धोरणे आणि टॅरिफमुळे बाजारात अनिश्चितता आहे.