
फोटो सौजन्य: Pinterest
28 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास 9 ते 9.15 वाजता हा विमान अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे सुरक्षारक्षक देखील उपस्थित होते. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अजित दादा यांच्यावर उद्या (दि.29) अंत्यसंस्कार होणार आहेत.
दादांचे जसे त्यांच्या कार्यकर्त्यांवर प्रेम होते अगदी तसेच प्रेम त्यांचे विविध कार्सवर देखील होते. ते नेहमीच विविध कारमधून प्रवास करीत असत. अजित दादांच्या ताफ्यात लाखांपासून ते कोटींपर्यंतच्या कार पाह्यला मिळतात. चला, त्यांच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.
Ajit Pawar funeral : अजित पवार यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार; बारामतीमध्ये लोटला जनसमुदाय
अजित पवारांच्या ताफ्यात अनेक कार्स पाहायला मिळतात. Lexus LX 570 ही त्यातीलच एक कार, जिची किंमत तब्बल अडीच कोटी रुपये आहे. Lexus LX 570 ही एक प्रीमियम फुल–साइज लक्झरी SUV आहे जी आपल्या दमदार क्षमता, आलिशान आराम आणि विश्वासार्हतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
दुसरी कार म्हणजे टोयोटा लँड क्रुझर, जिची किंमत देखील 1 कोटींपेक्षा जास्त आहे. ही जगातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह फुल–साइज SUV आहे, जी कठीण रस्त्यांवरही समाधानकारक कार्यक्षमता देते.
भारतात टोयोटा कॅमरी देखील एक लोकप्रिय कार आहे. जी अजित पवारांच्या ताफ्यात पाहायला मिळाली होती. या कारची किंमत 48 लाख रुपये आहे. माहितीनुसार, होंडा एकॉर्ड आणि होंडा CR V देखील अजित पवारांच्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट होत्या. होंडा एकॉर्ड आणि होंडा CR-V ही दोन लोकप्रिय आणि विश्वासार्ह वाहनं आहेत जी Honda च्या नावाखाली विश्वासार्हतेसाठी ओळखली जातात. होंडा एकॉर्ड ही एक स्टायलिश आणि परफॉर्मंट सेडान आहे, ज्यात स्मूद इंजिन, उत्तम राइड क्वालिटी आणि प्रगत फीचर्स मिळतात.
महत्वाची सुचना: सदर माहिती काही वेबसाईट आणि व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. या माहितीशी नवराष्ट्र सहमत असेल असे नाही.