उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज संध्याकाळी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे (फोटो- सोशल मीडिया)
Ajit Pawar funeral : बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे अपघाती निधन झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळी 9 ते 9.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे सुरक्षारक्षक देखील उपस्थित होते. अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्यावर उद्या (दि.29) अंत्यसंस्कार होणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये लॅंडिगदरम्यान अपघात झाला. मुंबईहून बारामतीला हे विमान चालले होते. मुंबईतून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी विमानाने टेक ऑफ केले होते. यानंतर बारामतीमध्ये आठ वाजून 50 मिनिटांनी लँडिंग होणार होते. मात्र लँडिंगच्या वेळी क्रॅश झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांचे पार्थिव सध्या बारामती रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या (गुरुवारी) अंत्यसंस्कार होणार आहे.
हे देखील वाचा: अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये तीन दिवसाचा दुखवटा, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. लवकरच जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार या लवकरच बारामतीला पोहचणार आहेत. यानंतर पुढील निर्णय घेतले जातील अशी माहिती रोहित पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: कल्पक आणि एकमेव निर्भीड राजकीय…’दादामाणूस’ गेल्याची भावना; अमित देशमुख यांनी व्यक्त केला शोक
कोण होते विमानामध्ये?
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानात अजित पवार यांच्यासह सहा जण उपस्थित होते. अजित पवारांसोबत एक पी.एस.ओ. आणि एक सहाय्यक प्रवास करत होते. तसेच विमान नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन क्रू मेंबर्स, ज्यात मुख्य पायलट आणि सह-पायलट यांचासुद्धा समावेश होता. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात एवढा भीषण होता की क्रॅश लँडिंगमध्ये विमानातील कोणत्याही व्यक्तीला वाचवण्यात यश आले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट यांचा मृत्यू झाला आहे.






