
Ajit Pawar Plane Crash Video (photo Credit- X)
NEW FOOTAGE CAPTURES AJIT PAWAR’S PLANE CRASHING. Visuals show the plane wasn’t on fire but just falling to the side under great speed. pic.twitter.com/Q47QchbiVc — Rahul Shivshankar (@RShivshankar) January 28, 2026
बुधवारी अजित पवार यांचे विमान लँडिंग स्ट्रिपला लागून असलेल्या भागात कोसळले. लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना विमानाचे नियंत्रण सुटले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वृत्तानुसार, विमान काही क्षणातच घसरले आणि कोसळले. अपघातानंतर सुमारे पाच स्फोट झाले आणि विमान आगीच्या लाटात अडकले. अपघातानंतर, विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि त्यात बसलेले सर्व जण मृत्युमुखी पडले.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. अधिकृत शासन निर्णयानुसार २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व शासकीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यात शासकीय सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार ३० जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व शासकीय तसेच खासगी शाळा बंद राहणार आहेत. याचबरोबर या कालावधीत कोणतेही शासकीय कार्यक्रम, समारंभ, उत्सव किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास सक्तीने बंदी घालण्यात आली आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तीन दिवसांच्या दुखवट्याच्या काळात कोणत्याही प्रकारचा जल्लोष, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा सार्वजनिक उत्सव होणार नाहीत. तसेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालये या कालावधीत बंद राहणार आहेत.