Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death News: राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर! ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्व शाळा राहतील बंद

मुंबईहून बारामतीकडे जात असताना विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले असून या अपघातात अन्य सहा जणांचाही मृत्यू झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 28, 2026 | 08:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बुधवारी सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

BPT आणि BOT अभ्यासक्रमांसाठी आता NEET द्वारेच प्रवेश! NCAHP ने जाहीर केली नोटीस

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी पवार कुटुंबियांचे भावूक शब्दांत सांत्वन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि मान्यवर बारामतीकडे रवाना झाले आहेत. अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने बारामतीत दाखल होत आहेत.

अजित पवार यांचे अंत्यविधी गुरुवारी सकाळी बारामती येथे होणार असून, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अग्निसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यविधीसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. अधिकृत शासन निर्णयानुसार २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व शासकीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यात शासकीय सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार ३० जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व शासकीय तसेच खासगी शाळा बंद राहणार आहेत. याचबरोबर या कालावधीत कोणतेही शासकीय कार्यक्रम, समारंभ, उत्सव किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास सक्तीने बंदी घालण्यात आली आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तीन दिवसांच्या दुखवट्याच्या काळात कोणत्याही प्रकारचा जल्लोष, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा सार्वजनिक उत्सव होणार नाहीत. तसेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालये या कालावधीत बंद राहणार आहेत.

१५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी! प्रथम क्रमांक मिळवला

अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक अनुभवी आणि प्रभावी नेता गमावला असून, त्यांच्या कार्याचा ठसा राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ राहणार आहे. राज्य शासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: All schools in the state will remain closed until this date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 08:52 PM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: “दादा गेले हे दुःख बघवत नाही…”, मनोज जरांगे पाटील बारामतीत भावूक; व्यक्त केला शोक
1

Ajit Pawar Plane Crash: “दादा गेले हे दुःख बघवत नाही…”, मनोज जरांगे पाटील बारामतीत भावूक; व्यक्त केला शोक

Ajit Pawar Plane Crash : प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे ते अजित पवार: महाराष्ट्राच्या राजकारणातील अकाली गमावलेले दिग्गज नेते…
2

Ajit Pawar Plane Crash : प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे ते अजित पवार: महाराष्ट्राच्या राजकारणातील अकाली गमावलेले दिग्गज नेते…

What is Black Box: ब्लॅक बॉक्स देणार अजित पवारांच्या अपघाताचे उत्तर! काय आहे ही टेक्नॉलॉजी? कशी उलगडणार विमानाची रहस्ये?
3

What is Black Box: ब्लॅक बॉक्स देणार अजित पवारांच्या अपघाताचे उत्तर! काय आहे ही टेक्नॉलॉजी? कशी उलगडणार विमानाची रहस्ये?

भारतात ‘प्रायव्हेट जेट’चा व्यवसाय किती मोठा? उड्डाणाचे नियम काय? जाणून घ्या चार्टर्ड प्लेनची संपूर्ण A टू Z सिस्टीम
4

भारतात ‘प्रायव्हेट जेट’चा व्यवसाय किती मोठा? उड्डाणाचे नियम काय? जाणून घ्या चार्टर्ड प्लेनची संपूर्ण A टू Z सिस्टीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.