ह्युंदाई मोटर ग्रुपच्या ‘जेनेसिस’ या लक्झरी ब्रँडने आपली नवीन फ्लॅगशिप फुल-साईझ ऑल-इलेक्ट्रिक SUV Genesis GV90 चे अनावरण केले आहे. Range Rover Electric आणि Mercedes-Maybach EQS SUV यांसारख्या अति-लक्झरी गाड्यांना टक्कर देण्यासाठी ही कार तयार करण्यात आली आहे. या कारची लांबी ५,२८५ मिमी, रुंदी २,०३० मिमी, उंची १,८१५ मिमी आणि व्हीलबेस ३,२४५ मिमी आहे. ही SUV स्टँडर्ड आणि ‘नेओलुन’ अशा दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल.
नेओलुन व्हर्जनमध्ये जगात पहिल्यांदाच स्वतंत्रपणे उघडणारे आणि बंद होणारे हिडन B-पिलर कोच डोअर्स देण्यात आले आहेत. याशिवाय विंग फेस मायक्रो लेन्स ॲरे हेडलाइट्स, क्लॅमशेल हूड, २४-इंच फोर्ज्ड व्हील्स आणि फ्लश-माउंटेड टेललाइट्समुळे या कारला अतिशय आकर्षक आणि आधुनिक लूक मिळतो.
महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर! लाइफस्टाईल पिकअप प्रेमींसाठी ३ नवीन डिझाइन थीम! पाहा काय आहे खास?
कारच्या आतील भागात २४.६-इंचांपर्यंत विस्तारणारी पॉप-अप OLED स्क्रीन, १८० अंश फिरणाऱ्या फ्रंट सीट्स आणि जगात पहिल्यांदाच वापरण्यात आलेली रूफ एअरबॅग एकूण १२ एअरबॅग्ज यांसारखे हाय-टेक फीचर्स मिळतात. यामध्ये स्टार्ट बटण दिलेले नाही; ड्रायव्हरने डोअर हँडल ओढताच कार आपोआप सुरू होऊन दार बंद होते. स्टीअरिंगवर मोशन कॉलम शिफ्टर आणि सेंटर कन्सोलमध्ये क्रिस्टल स्फिअर कंट्रोलर देण्यात आले आहे.
या कारमध्ये ड्युअल-मोटर सेटअप दिला असून तो ६५७ hp ची पॉवर आणि ८०० Nm चा टॉर्क जनरेट करतो. यातील १२३.५ kWh बॅटरी पॅक अवघ्या २२ मिनिटांत १०% ते ८०% चार्ज होतो आणि एका चार्जमध्ये सुमारे ५०० किलोमीटरची रेंज देतो. तसेच यामध्ये रिअर-व्हील स्टीअरिंग, मल्टी-चेंबर एअर सस्पेंशन आणि ड्युअल e-LSD यांसारखे ॲडव्हान्स फीचर्सही समाविष्ट आहेत.
TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!
जेनेसिस ब्रँड भारतात प्रवेश करत असून प्रथम GV80 ही मॉडेल सादर केली जाऊ शकते. त्यानंतर ही फ्लॅगशिप GV90 SUV भारताच्या शोूम्समध्ये २०२८ च्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे.






