Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोयोटाची नवव्या पिढीतील ‘ऑल-न्यू हाइलक्स’ भारतात लाँच; ३१.९९ लाख रुपयांपासून किंमत सुरू

टोयोटा किर्लोस्कर मोटरने ३१.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत 'ऑल-न्यू हाइलक्स' भारतात लाँच केली आहे. २.८-लिटर डिझेल इंजिन, प्रगत ४X४ क्षमता आणि सात एअरबॅग्स असलेली ही ९ व्या पिढीतील एसयूव्ही दणकट डिझाइनसह सादर झाली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 30, 2026 | 07:41 PM
टोयोटाची नवव्या पिढीतील ‘ऑल-न्यू हाइलक्स’ भारतात लाँच; ३१.९९ लाख रुपयांपासून किंमत सुरू
Follow Us
Follow Us:
  • टोयोटा किर्लोस्कर मोटरने ‘ऑल-न्यू हाइलक्स’ ही नवव्या पिढीतील दमदार एसयूव्ही भारतात अधिकृतपणे लाँच केली.
  • या एसयूव्हीमध्ये २.८-लिटर डिझेल इंजिन आणि ५०० एनएम टॉर्कसह प्रगत ४X४ सिस्टीम दिली आहे.
  • भारतीय बाजारात या नव्या टोयोटा हाइलक्सची एक्स-शोरूम किंमत ३१.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने आज आपल्या प्रतिष्ठित ‘ऑल-न्यू हाइलक्स’ या वाहनाच्या भारतातील अनावरणाची घोषणा केली. देशातील आपल्या एसयूव्ही श्रेणीला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. टोयोटाच्या विश्वासार्हता, टिकाऊपणा आणि उत्कृष्ट गुणवत्तेच्या परंपरेचे प्रतीक असलेली ही नवव्या पिढीतील हाइलक्स रग्ड टिकाऊपणा आणि अष्टपैलू कामगिरी सादर करण्यासाठी विशेषरीत्या डिझाइन करण्यात आली आहे.

आयएमव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित, ऑल-न्यू हाइलक्स हे वाहन अत्यंत खडतर कामांसाठी टिकाऊ, शहरी ड्रायव्हिंगसाठी आरामदायक आणि साहसी प्रवासासाठी सक्षम असण्यासोबतच उत्कृष्ट अष्टपैलू उपयुक्तता प्रदान करते. ही लवचिकता टोयोटाच्या ‘मोबिलिटी फॉर ऑल’ या कटिबद्धतेला बळकट करते, तसेच ग्राहकांशी असलेले आजीवन नाते अधिक दृढ करते.

या नव्या अनावरणाबाबत बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  मसाकाझु योशिमुरा म्हणाले, “टोयोटा किर्लोस्कर मोटरमध्ये ग्राहक-केंद्रितता म्हणजे ग्राहकांच्या आजच्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्या भविष्यातील आकांक्षांसाठी सज्ज राहणे होय. भारतातील जवळपास तीन दशकांच्या प्रवासात, आम्ही आमच्या ग्राहकांचे ऐकून, भविष्यात गुंतवणूक करून आणि विश्वास, गुणवत्ता व विश्वासार्हतेवर आधारित मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करून सातत्याने प्रगती केली आहे. आमच्या ‘मोबिलिटी फॉर ऑल’ या व्हिजनने प्रेरित होऊन, आम्ही दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्यासाठी आणि पिढ्यानपिढ्या ग्राहकांचा विश्वास जिंकणारी उत्पादने तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. ऑल-न्यू हाइलक्स ही दिशा अधिक मजबूत करते.”

किया सोरेंटो हायब्रिड SUV लवकरच भारतात होणार लाँच! जाणून घ्या सर्व महत्त्वाची माहिती

उत्पादनाच्या वैशिष्ट्यांवर बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट (सेल्स-सर्व्हिस-यूज्ड कार बिझनेस) सबरी मनोहर म्हणाले, “ऑल-न्यू हाइलक्सचे बाह्य आणि अंतर्गत डिझाइन ‘टफ अँड एजाइल’ संकल्पनेअंतर्गत करण्यात आले आहे, ज्यामध्ये ‘मजबुती आणि चपळता’ यांचा मिलाफ आहे. २.८-लिटर इंजिन, टोयोटाची प्रसिद्ध ४डब्ल्यूडी क्षमता, १२.३-इंच इन्फोटेनमेंट सिस्टीमसह आय-कनेक्टसारखे प्रगत कनेक्टेड तंत्रज्ञान आणि सात एअरबॅग्ससह सर्वसमावेशक सुरक्षा फीचर्सच्या बळावर ही नवी हाइलक्स ग्राहकांच्या अपेक्षांवर खरी उतरेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

‘टफ अँड एजाइल’ डिझाइन व बाह्यस्वरूप:

“टफ अँड एजाइल” संकल्पनेअंतर्गत डिझाइन केलेली ऑल-न्यू हाइलक्स दणकट मजबुती आणि डायनॅमिक चपळता एकत्र आणते. याचे बोल्ड फ्रंट-एंड “सायबर सुमो” संकल्पनेपासून प्रेरित आहे, जे सुमो कुस्तीमधील प्रतिष्ठित प्री-कॉम्बॅट पोश्चर (लढाईपूर्वीची मुद्रा) दर्शवते. नवीन डिझाइन केलेला फ्रंट बंपर, पियानो ब्लॅक अॅक्सेंट, वेलकम फंक्शनसह एलईडी हेडलाइट्स, एलईडी फॉग लॅम्प्स आणि वैशिष्ट्यपूर्ण डे-टाईम रनिंग लाईट्स याचे आधुनिक स्वरूप अधिक निखरतात. याशिवाय अलॉय व्हील्स, अॅरोडायनामिक स्टेबिलायझिंग फिन, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल व रिट्रॅक्टेबल ओआरव्हीएम्स, एलईडी रिअर कॉम्बिनेशन लॅम्प्स आणि शार्प-फिन अँटेना यामुळे वाहनाची दृश्यमानता आणि स्थिरता अधिक वाढते.

शक्तिशाली आणि सहज परफॉर्मन्स:

या वाहनात १५० केडब्ल्यू आणि ५०० एनएम टॉर्क देणारे २.८-लिटर BS6 फेझ २ डिझेल इंजिन ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. ८०-लिटर क्षमतेच्या इंधन टाकीसह हे वाहन महामार्ग, शहरी रस्ते आणि आव्हानात्मक रस्त्यांवर दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी अत्यंत कार्यक्षम आहे.

उत्कृष्ट ४X४ ऑफ-रोडिंग क्षमता:

टोयोटाची प्रगत फोर-व्हील-ड्राइव्ह सिस्टीम (हाय – एच४ आणि लो – एल४ रेंज) कोणत्याही भूप्रदेशावर सहज मात करते. इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक आणि डाऊनहिल असिस्ट कंट्रोल याच्या ऑफ-रोड क्षमतेला अधिक बळकट करतात. डबल विशबोन (फ्रंट) आणि लीफ स्प्रिंग (रिअर) सस्पेंशनमुळे प्रवासात उत्कृष्ट रोड ग्रिप आणि स्मूथ राइड मिळते.

Ford Explorer आणि Lincoln Aviator ड्रायव्हर सीटमध्ये तांत्रिक बिघाड! कंपनीकडून हजारो गाड्या मागे मागवल्या!

आधुनिक केबिन आणि प्रगत तंत्रज्ञान:

गाडीच्या आत सॉफ्ट-टच अपहोल्स्ट्री, मेटॅलिक अॅक्सेंट, आणि एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले कॉकपिट दिलेले आहे. १२.३-इंच इन्फोटेनमेंट डिस्प्ले (अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेसह), नवीन ऑप्टिट्रॉन मेटल-टोन कॉम्बीमीटर, टोयोटा आय-कनेक्ट तंत्रज्ञान, ८-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, पीएम२.५ एअर फिल्टरेशन, पुश स्टार्ट/स्टॉप आणि तीन ड्राईव्ह मोड (इको, नॉर्मल आणि स्पोर्ट) यांमुळे प्रवाशांना आरामदायी व जोडलेला अनुभव मिळतो.

सर्वसमावेशक सुरक्षा व्यवस्था:

सुरक्षेसाठी यात सात एसआरएस एअरबॅग्स, व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल, ब्रेक असिस्टसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इमर्जन्सी ब्रेक सिग्नल, आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकरेज आणि जिओए बॉडी स्ट्रक्चर दिलेले आहे. याव्यतिरिक्त, पॅनोरॅमिक व्ह्यू मॉनिटर, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स आणि टीपीएमएस (TPMS) ड्रायव्हरचा आत्मविश्वास वाढवतात.

रंग आणि आकर्षक किती:

ऑल-न्यू हाइलक्स ६ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे: सुपर व्हाईट, प्लॅटिनम पर्ल व्हाईट, अॅटिट्यूड ब्लॅक+, इमोशनल रेड, सल्फर मेटॅलिक+ आणि ॲश. याशिवाय विविध ओरिजिनल एक्सेसरीजद्वारे ग्राहक हे वाहन कस्टमाइझ करू शकतात. तिचे प्रकार आणि एक्स-शोरूम किमती ४X२ जीएक्स, एटी (३१,९९,००० रुपये), ४X४ जीएक्स, एटी (३३,६९,००० रुपये) आणि ४X४ व्हीएक्स, एटी (३६,६९,००० रुपये) अशा ठेवण्यात आल्या आहेत.

Web Title: All new toyota hilux launched in india price features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • toyota

संबंधित बातम्या

मिनी कन्व्हर्टिबल ‘Stardust Edition’ 62.90 लाख रुपयांना लाँच! 204 hp ची पावर; पाहा काय आहेत फीचर्स
1

मिनी कन्व्हर्टिबल ‘Stardust Edition’ 62.90 लाख रुपयांना लाँच! 204 hp ची पावर; पाहा काय आहेत फीचर्स

किया सोरेंटो हायब्रिड SUV लवकरच भारतात होणार लाँच! जाणून घ्या सर्व महत्त्वाची माहिती
2

किया सोरेंटो हायब्रिड SUV लवकरच भारतात होणार लाँच! जाणून घ्या सर्व महत्त्वाची माहिती

Ford Explorer आणि Lincoln Aviator ड्रायव्हर सीटमध्ये तांत्रिक बिघाड! कंपनीकडून हजारो गाड्या मागे मागवल्या!
3

Ford Explorer आणि Lincoln Aviator ड्रायव्हर सीटमध्ये तांत्रिक बिघाड! कंपनीकडून हजारो गाड्या मागे मागवल्या!

१९८० च्या दशकातील ‘या’ ५ भन्नाट कॉन्सेप्ट कार्स; ज्या रस्त्यावर उतरल्या असत्या तर इतिहास घडला असता!
4

१९८० च्या दशकातील ‘या’ ५ भन्नाट कॉन्सेप्ट कार्स; ज्या रस्त्यावर उतरल्या असत्या तर इतिहास घडला असता!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.