
भारतात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वाढत असताना, आता एप्रिलिया ही लोकप्रिय इटालियन ब्रँड भारतीय कस्टमर्ससाठी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याच्या तयारीत आहे. पियाजिओ ग्रुपच्या या आगामी स्कूटर रेंजमध्ये इलेक्ट्रिक आणि पेट्रोलवर चालणारे मॉडेल्स असतील. कंपनीच्या माहितीनुसार, ही नवीन रेंज 2027 मध्ये भारतात लाँच केली जाईल. विशेष म्हणजे, या स्कूटर्सची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹85,000 ते ₹90,000 च्या आसपास असू शकते, तर प्रीमियम इलेक्ट्रिक मॉडेल्सची किंमत ₹1.30 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
पियाजिओ व्हेइकल्सचे चेअरमन, सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर डिएगो ग्राफी यांनी या योजनेला दुजोरा दिला आहे. कंपनी भारतासाठी खास नवीन प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. या प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक स्कूटर्ससोबत 125cc पेट्रोल इंजिन असलेल्या स्कूटर्सही तयार केल्या जातील. त्यामुळे वेगवेगळ्या बजेटमधील कस्टमर्सना त्यांच्या गरजेनुसार योग्य मॉडेल निवडण्याची संधी मिळू शकते.
या नव्या प्लॅटफॉर्मची खासियत म्हणजे तो सुरुवातीपासूनच इलेक्ट्रिक आणि पेट्रोल दोन्ही प्रकारच्या स्कूटर्सना लक्षात घेऊन विकसित केला जात आहे. पेट्रोल स्कूटरच्या प्लॅटफॉर्ममध्ये नंतर बदल करून इलेक्ट्रिक मॉडेल तयार करण्याऐवजी, इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा सुरुवातीपासून विचार केला जात आहे. यामुळे खर्च, रेंज, परफॉर्मन्स आणि वाहनाची किंमत यांचा समतोल साधण्यास मदत होऊ शकते. कंपनी गेल्या काही वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम करत आहे.
फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर
दरम्यान, पियाजिओने स्पष्ट केले आहे की, सध्या वेस्पा ब्रँडअंतर्गत इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याची योजना नाही. परवडणारी किंमत राखून अपेक्षित रेंज आणि परफॉर्मन्स देण्याच्या दृष्टीने कंपनीला नवीन प्लॅटफॉर्म जास्त योग्य वाटतो. दिल्लीच्या EV Policy 2026 सारख्या घडामोडींवर कंपनी लक्ष ठेवून असली, तरी तिचे लक्ष्य केवळ एका राज्यापुरते मर्यादित नाही.
भारतामध्ये प्रोडक्शन करून परदेशात निर्यात वाढवण्याचाही कंपनीचा मानस आहे. सध्या बारामती येथील प्रोडक्शनमधील सुमारे 10 ते 20% दुचाकींची निर्यात केली जाते. भविष्यात हे प्रमाण किमान 50% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. भारतात तयार होणाऱ्या आगामी एप्रिलिया इलेक्ट्रिक आणि पेट्रोल स्कूटर्स युरोपसह इतर जागतिक मार्केटमध्येही पाठवल्या जाऊ शकतात. त्यामुळे 2027 मधील ही रेंज भारतीय ग्राहकांसाठीच नव्हे, तर कंपनीच्या जागतिक विस्तारासाठीही महत्त्वाची ठरणार आहे.
लॉंग राइडसाठी इलेक्ट्रिक स्कूटर घेताय? सीटपासून परफॉर्मन्सपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की तपासा!
💡 Frequently Asked Questions
प्रश्न 1: एप्रिलियाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात कधी लाँच होणार?
उत्तर: पियाजिओ ग्रुपच्या माहितीनुसार, एप्रिलियाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि पेट्रोल स्कूटर्सची रेंज 2027 मध्ये भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे.
प्रश्न 2: एप्रिलियाच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची संभाव्य किंमत किती असेल?
उत्तर: नवीन रेंजची एक्स-शोरूम किंमत ₹85,000 ते ₹1.30 लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. प्रीमियम इलेक्ट्रिक मॉडेल्सची किंमत या श्रेणीच्या वरच्या टप्प्यात असू शकते. अंतिम किंमती कंपनीच्या घोषणेनंतर स्पष्ट होतील.
प्रश्न 3: एप्रिलियाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर वेस्पा ब्रँडअंतर्गत येणार का?
उत्तर: सध्या पियाजिओची वेस्पा ब्रँडअंतर्गत इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याची योजना नाही. कंपनी खर्च, रेंज आणि परफॉर्मन्स यांचा समतोल साधण्यासाठी खास नवीन प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित करत आहे.