Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॉर्टनची नवीन 450cc बाईक भारतात येणार! 45 hp पॉवरसह रॉयल एनफिल्ड गुरिल्ला 450 ला देणार टक्कर?

ब्रिटिश ब्रँड नॉर्टनची नवीन 450cc रोडस्टर बाईक नोव्हेंबर 2026 मध्ये EICMA शोमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. 45 hp पर्यंत पॉवर, 6-स्पीड गिअरबॉक्स आणि रेट्रो-मॉडर्न डिझाइनसह ही बाईक 2027 मध्ये भारतात येऊ शकते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 19, 2026 | 03:51 PM
नॉर्टनची नवीन 450cc बाईक भारतात येणार! 45 hp पॉवरसह रॉयल एनफिल्ड गुरिल्ला 450 ला देणार टक्कर?
Follow Us
Follow Us:
  • नॉर्टनची नवीन 450cc रोडस्टर 2027 मध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.
  • या बाईकमध्ये 45 hp पॉवर आणि 45 Nm पेक्षा जास्त टॉर्क मिळू शकतो.
  • रॉयल एनफिल्ड गुरिल्ला 450 शी स्पर्धा करताना किंमत आणि सर्व्हिस नेटवर्क महत्त्वाचे ठरतील.
ब्रिटिश प्रीमियम मोटरसायकल ब्रँड नॉर्टन भारतात आपली घट्ट पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे. टीव्हीएस मोटरच्या मालकीची असलेली ही कंपनी नवीन 450cc सिंगल-सिलिंडर रोडस्टर बाईक सादर करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, या बाईकचा डेब्यू नोव्हेंबर 2026 मध्ये इटलीतील मिलान येथे होणाऱ्या EICMA मोटरसायकल शोमध्ये होऊ शकतो. त्यानंतर 2027 च्या दुसऱ्या सहामाहीत भारतीय मार्केटमध्ये तिचे लाँच अपेक्षित आहे. ही बाईक कंपनीच्या अ‍ॅटलस आणि मॅन्क्स मॉडेल्सच्या खाली प्लेस मिळवू शकते.

टीव्हीएसच्या होसूर प्लांटमध्ये होणार प्रोडक्शन?

नवीन नॉर्टन 450cc रोडस्टरचे प्रोडक्शन तामिळनाडूमधील टीव्हीएस मोटरच्या होसूर प्लांटमध्ये होण्याची शक्यता आहे. नॉर्टनच्या भारतीय उत्पादन व्यवस्थेत या प्लांटची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. जून 2026 मध्ये याच प्लांटमध्ये अ‍ॅटलस मोटरसायकलचे पहिले युनिट तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. टीव्हीएसने एप्रिल 2020 मध्ये नॉर्टनचे अधिग्रहण केल्यानंतर ब्रँडच्या विकासासाठी 250 दशलक्ष ब्रिटिश पाउंडपेक्षा जास्त इन्वेस्टमेंट केल्याचेही सांगितले जाते.

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या

450cc इंजिनमधून मिळणार 45 hp पॉवर?

रिपोर्टनुसार, या नवीन बाईकमध्ये लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन 40 ते 45 hp पॉवर आणि 45 Nm पेक्षा जास्त टॉर्क निर्माण करू शकते. इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे. या बाईकसाठी H-सिरीज नावाच्या नवीन इंजिन प्लॅटफॉर्मचा वापर होऊ शकतो. भविष्यात याच प्लॅटफॉर्मवर आणखी मोटरसायकल तयार करण्याची कंपनीची योजना असू शकते.

रेट्रो लूक आणि आधुनिक फीचर्स

डिझाइनच्या बाबतीत नवीन नॉर्टन रोडस्टरमध्ये रेट्रो आणि मॉडर्न स्टाइलचा मिलाफ पाहायला मिळू शकतो. यात 17-इंच व्हील्स, 8-इंच TFT डिस्प्ले, रायडिंग मोड्स आणि इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल यांसारखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय ड्युअल-चॅनल ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोलही दिले जाऊ शकतात. ही फीचर्स अद्याप संभाव्य आहेत; कंपनीने संपूर्ण स्पेसिफिकेशन्स ऑफीशली जाहीर केलेले नाहीत.

रॉयल एनफिल्ड आणि ट्रायम्फला मिळणार टक्कर?

भारतात लाँच झाल्यानंतर या बाईकची स्पर्धा रॉयल एनफिल्ड गुरिल्ला 450 आणि ट्रायम्फच्या मध्यम क्षमतेच्या मोटरसायकलशी होऊ शकते. 350cc पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या मोटरसायकलवर लागू होणाऱ्या GST दरांचाही किंमतीवर परिणाम होऊ शकतो. नॉर्टनच्या भारतातील लिमिटेड डीलरशिप नेटवर्कमुळे विक्री, सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्सची अवेलेबलीटी हेही महत्त्वाचे मुद्दे असतील. त्यामुळे बाईकची लास्ट प्राइज आणि कस्टमर्सपर्यंत पोहोचण्याची क्षमता तिच्या यशासाठी महत्त्वाची ठरू शकते

रंग बदलणारी रॉयल एनफिल्ड आली राव! क्लासिक 650 चे फक्त 125 युनिट्स; किंमत पाहून व्हाल थक्क!

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: नॉर्टनची नवीन 450cc बाईक भारतात कधी लाँच होणार?

उत्तर: रिपोर्टनुसार, ही बाईक 2026 च्या नोव्हेंबरमध्ये EICMA शोमध्ये सादर होऊ शकते. भारतातील लाँच 2027 च्या दुसऱ्या सहामाहीत अपेक्षित आहे. कंपनीने अद्याप तारीख जाहीर केलेली नाही.

प्रश्न 2: नॉर्टन 450cc बाईकमध्ये किती पॉवर मिळू शकते?

उत्तर: संभाव्य माहितीनुसार, लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन 40 ते 45 hp पॉवर आणि 45 Nm पेक्षा जास्त टॉर्क देऊ शकते. यात 6-स्पीड गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे.

प्रश्न 3: नॉर्टन 450cc बाईकची स्पर्धा कोणत्या मॉडेल्सशी होईल?

उत्तर: भारतात लाँच झाल्यास या बाईकची स्पर्धा रॉयल एनफिल्ड गुरिल्ला 450 आणि ट्रायम्फच्या मध्यम क्षमतेच्या मोटरसायकलशी होऊ शकते. अंतिम स्पर्धक तिची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सवर अवलंबून असतील.

Web Title: New norton 450cc bike india launch eicma 2026 report auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • automobile
  • royal enfield

संबंधित बातम्या

सप्टेंबरमध्ये कोणाची स्कूटर सर्वाधिक विकली TVS iQubeचा जलवा, चेतकला टक्कर आणि विडाची धडाकेबाज एन्ट्री!
1

सप्टेंबरमध्ये कोणाची स्कूटर सर्वाधिक विकली TVS iQubeचा जलवा, चेतकला टक्कर आणि विडाची धडाकेबाज एन्ट्री!

किया इंडियाचा मोठा निर्णय! सर्व वाहनांना सायबर सुरक्षेचे AIS 189 आणि AIS 190 प्रमाणपत्र
2

किया इंडियाचा मोठा निर्णय! सर्व वाहनांना सायबर सुरक्षेचे AIS 189 आणि AIS 190 प्रमाणपत्र

मर्सिडीज-AMG GT SUV चा दमदार डेब्यू! 1,153 hp पॉवर, 710 kW फास्ट चार्जिंग आणि 700 km रेंज
3

मर्सिडीज-AMG GT SUV चा दमदार डेब्यू! 1,153 hp पॉवर, 710 kW फास्ट चार्जिंग आणि 700 km रेंज

सिट्रोएन भारतात आणणार 3 नवीन गाड्या! छोटी कार, मोठी SUV आणि MPV साठी तयारी सुरु
4

सिट्रोएन भारतात आणणार 3 नवीन गाड्या! छोटी कार, मोठी SUV आणि MPV साठी तयारी सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.