Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

हलकी, चपळ आणि फीचर्सने भरलेली ट्यूनो 457 एका बाजूला आहे, तर 648cc इंजिन आणि कॅफे रेसर लुकची GT 650 दुसऱ्या बाजूला. तुमच्या राइडिंग स्टाइलनुसार या दोघांपैकी कोणती बाइक जास्त योग्य ठरेल, जाणून घ्या.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 05, 2026 | 08:02 PM
अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
Follow Us
Follow Us:
  • ट्यूनो 457 हलकी असून स्पोर्टी हँडलिंग आणि आधुनिक टेक्नोलॉजीमुळे शहरातही राइडिंगचा वेगळा अनुभव देते.
  • कॉन्टिनेंटल GT 650 चा 648cc ट्विन इंजिन जास्त टॉर्क देत असल्याने दमदार पुलिंग अनुभव मिळतो.
  • फीचर्समध्ये ट्यूनो पुढे, तर रेट्रो स्टाइल आणि क्लासिक कॅफे रेसर फीलमध्ये GT 650 आघाडीवर आहे.
एकीकडे आधुनिक लुक, हलकं वजन आणि रेसिंगपासून प्रेरित टेक्नोलॉजी असलेली अप्रिलिया ट्यूनो 457 स्पेशल एडिशन, तर दुसरीकडे रेट्रो स्टाइल, दमदार टॉर्क आणि कॅफे रेसरची खास ओळख असलेली रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT 650. दोन्ही बाइक्सची किंमत जवळपास समान पातळीवर असल्यामुळे या दोन मोटरसायकलींची तुलना राइडर्ससाठी चांगलीच रंजक ठरते.

किंमत आणि ओनरशिप

अप्रिलिया ट्यूनो 457 स्पेशल एडिशनची एक्स-शोरूम किंमत ₹3.99 लाख आहे, तर रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT 650 ची सुरुवातीची किंमत ₹3.53 लाख आहे. कॉन्टिनेंटल GT 650 च्या टॉप क्रोम व्हेरिएंटची किंमत ₹3.82 लाखपर्यंत जाते. ट्यूनोला 4 वर्षे किंवा 48,000 किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी आणि 2 वर्षांची रोडसाइड असिस्टन्स मिळते. GT 650 ला 3 वर्षे किंवा 40,000 किलोमीटरची वॉरंटी आणि 1 वर्षाची रोडसाइड असिस्टन्स मिळते.

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर

वजन आणि राइडिंगमध्ये मोठा फरक

डिझाइनच्या बाबतीत दोन्ही बाइक्स पूर्णपणे वेगळ्या विचारसरणीच्या आहेत. ट्यूनो 457 कॉम्पॅक्ट, मस्क्युलर आणि आक्रमक स्ट्रीटफायटरसारखी दिसते. तिचे कर्व वजन 175 किलो आहे. त्याच्या तुलनेत कॉन्टिनेंटल GT 650 चे वजन 214 किलो आहे. म्हणजे ट्यूनो जवळपास 39 किलो हलकी आहे. त्यामुळे शहरात ट्रॅफिकमधून बाइक हाताळताना अप्रिलिया तुलनेने सोपी वाटू शकते.

कॉन्टिनेंटल GT 650 मध्ये पुढे झुकलेला कॅफे रेसर पोस्चर मिळतो, तर ट्यूनो 457 मध्ये तुलनेने सरळ आणि आरामदायी राइडिंग पोस्चर आहे. ट्यूनोमध्ये 41 मिलीमीटर USD फोर्क, मोनोशॉक आणि प्रीलोड अॅडजस्टमेंट मिळते. तिच्या हलक्या वजनासोबत 17-इंच चाके आणि रुंद टायर मिळत असल्याने वळणांमध्ये ती जास्त चपळ ठरते.

फीचर्समध्ये ट्यूनोची आघाडी

फीचर्सच्या बाबतीत अप्रिलिया ट्यूनो 457 स्पष्टपणे पुढे जाते. यात 5-इंच फुल-कलर TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, कॉल आणि SMS अलर्ट, राइडिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल आणि राइड-बाय-वायर मिळते. याशिवाय ड्युअल-चॅनल ABS मध्ये रियर ABS स्विच करण्याची सुविधाही आहे. कॉन्टिनेंटल GT 650 मध्ये रेट्रो डिझाइनला साजेसा अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि तुलनेने साधा इलेक्ट्रॉनिक्स सेटअप मिळतो.

Himalayan 440 ची बुकिंग बंद! 6 महिन्यांची वेटिंग, Royal Enfield ने घेतला मोठा निर्णय

इंजिनमध्ये कोण भारी?

ट्यूनो 457 मध्ये 457cc लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 47.6PS पॉवर आणि 43.5Nm टॉर्क देते. कॉन्टिनेंटल GT 650 मध्ये 648cc एअर/ऑईल-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन असून ते 47.4PS पॉवर आणि 52.3Nm टॉर्क तयार करते. म्हणजे पॉवर जवळपास समान असली तरी GT 650 चा टॉर्क जास्त आहे. त्यामुळे कमी RPM वर दमदार पुलिंग अनुभव हवा असल्यास रॉयल एनफील्ड आकर्षक ठरते.

कोणती बाइक घ्यावी?

तुम्हाला आधुनिक स्ट्रीटफायटर लुक, हलकं वजन, स्पोर्टी हँडलिंग, जास्त इलेक्ट्रॉनिक्स आणि आक्रमक राइडिंग आवडत असेल, तर अप्रिलिया ट्यूनो 457 स्पेशल एडिशन योग्य ठरू शकते. पण रेट्रो डिझाइन, दमदार टॉर्क, कॅफे रेसरचा फील आणि तुलनेने सोपी ओनरशिप हवी असेल, तर रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT 650 अधिक योग्य पर्याय ठरते. थोडक्यात, ट्यूनो 457 वेग आणि टेक्नोलॉजीकडे झुकते, तर GT 650 स्टाइल आणि टॉर्कचा क्लासिक अनुभव देते.

Web Title: Aprilia tuono 457 vs royal enfield gt650 comparison auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
1

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर
2

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर

Suzuki SV-7GX! जास्त फीचर्सच्या शर्यतीपासून दूर राहून Suzuki ने बनवली स्मार्ट बाईक! जाणून घ्या खासियत
3

Suzuki SV-7GX! जास्त फीचर्सच्या शर्यतीपासून दूर राहून Suzuki ने बनवली स्मार्ट बाईक! जाणून घ्या खासियत

उन्हाने कारची सीट तापली? टेन्शन नॉट! ₹8.20 लाखांपासून या ५ कार्समध्ये मिळतोय ‘व्हेंटीलेटेड सिट’चा भन्नाट कूलिंग कम्फर्ट!
4

उन्हाने कारची सीट तापली? टेन्शन नॉट! ₹8.20 लाखांपासून या ५ कार्समध्ये मिळतोय ‘व्हेंटीलेटेड सिट’चा भन्नाट कूलिंग कम्फर्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.