फोटो सौजन्य: AI
रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही ब्रांड न्यू अपकमिंग फ्लॅगशिप अॅडव्हेंचर बाईक यावेळी जवळपास पूर्णपणे अनकॅमफ्लाज्ड अवस्थेत 3 वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसली आहे. पांढरा, हलका ग्रे आणि लाल-काळा अशा रंगांमध्ये दिसलेल्या बाईक्समध्ये प्रॉडक्शन-स्पेक बॉडीवर्क, लाइटिंग आणि टूरिंगसाठी आवश्यक उपकरणे स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे बाईकच्या अंतिम डिझाइनबाबत आता बरीच माहिती समोर आली आहे.
डिझाइनसोबत टूरिंगवरही फोकस
पांढऱ्या रंगाच्या मॉडेलवर ऑरेंज आणि रेड ग्राफिक्स देण्यात आले आहेत, तर ग्रे व्हर्जनला साधा आणि प्रीमियम लूक मिळतो. लाल-काळ्या मॉडेलमध्ये डार्क लोअर पॅनल्स आणि कॉन्ट्रास्टिंग स्ट्राइप्स आहेत. तिन्ही बाईक्समध्ये उंच विंडस्क्रीन, मोठा फ्युल टँक आणि लांब टूरिंग सीट दिसते. 2 बाईक्सवर मोठे सॉफ्ट पॅनिअर्स आणि मागच्या बाजूला मोठा लगेज रॅकही दिसत आहे.
Royal Enfield ची विक्रमी कामगिरी! सप्टेंबरमध्ये 1.34 लाखांहून जास्त बाइक्सची विक्री
हिमालयन 450 पेक्षा मोठा सेटअप
हिमालयन 750 मध्ये अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स आणि ट्विन फ्रंट डिस्क ब्रेक्स देण्यात येणार आहेत. वायर-स्पोक व्हील्स आणि ड्युअल-पर्पज टायर्सही कायम ठेवले जातील. याआधीच्या टेस्ट म्यूल्सवर 19-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर व्हील सेटअप दिसला होता. त्यामुळे हिमालयन 450च्या 21-इंच फ्रंट व्हीलच्या तुलनेत 750 जास्त रोड-बायस्ड टूरिंगकडे झुकणारी बाईक ठरू शकते.
750 cc ट्विन-सिलिंडर इंजिनची ताकद
रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 मध्ये सुमारे 750 cc क्षमतेचे पॅरलल-ट्विन इंजिन मिळण्याची शक्यता आहे. या इंजिनमधून अंदाजे 55 ते 60 bhp पॉवर आणि 60 ते 65 Nm टॉर्क मिळू शकतो. इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर-असिस्ट क्लच स्टँडर्ड मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या राइडिंगसाठी बाईकची परफॉर्मन्स आणि कम्फर्ट दोन्ही वाढण्याची अपेक्षा आहे.
Himalayan 440 ची बुकिंग बंद! 6 महिन्यांची वेटिंग, Royal Enfield ने घेतला मोठा निर्णय
फीचर्समध्येही मोठी झेप
हिमालयन 750 मध्ये TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल, राइड-बाय-वायर, क्रूझ कंट्रोल आणि प्रीलोड अॅडजस्टमेंटसह मोनोशॉक मिळू शकतो. या बाईकचा ग्लोबल डेब्यू येणाऱ्या काही महिन्यांत होण्याची शक्यता असून त्यानंतर भारतात विक्री सुरू होऊ शकते. हिमालयन 450पेक्षा वर स्थान मिळवणारी ही बाईक रॉयल एनफिल्डच्या अॅडव्हेंचर रेंजमधील नवा फ्लॅगशिप ऑप्शन ठरणार आहे.






