Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Auto Tips: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक

Automatic Car Tips: भारतातील वाढत्या ट्रॅफिकमुळे अनेकजण आता ऑटोमॅटिक कारला पसंती देत आहेत. मात्र ऑटोमॅटिक कार चालवताना काही सामान्य चुका केल्यास गाडीचा गियरबॉक्स खराब होऊ शकतो आणि मोठा खर्च येऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 23, 2026 | 09:34 AM
Auto News: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक

Auto News: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक

Follow Us
Follow Us:
  • गाडी पूर्णपणे न थांबवता D वरून R किंवा P मोडमध्ये शिफ्ट केल्यास गियरबॉक्स खराब होऊ शकतो.
  • उतारावर न्यूट्रल मोड वापरल्यास गाडीवरील कंट्रोल कमी होतो आणि गियरबॉक्सला नुकसान पोहोचू शकते.
  • ट्रॅफिकमध्ये वारंवार P मोड वापरणे आणि चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणे गियरबॉक्ससाठी घातक ठरू शकते.
Automatic Car Updates: भारतात प्रत्येकवेळी लोकांना ट्रॅफिकच्या समस्येचा सामना करावा लागतो. ट्रॅफिकमध्ये वैतागलेल्या लोकांसाठी ऑटोमॅटिक कारचा पर्याय नेहमीच फायद्याचा आणि आरामदायक ठरू शकतो. कारण मॅन्युअल कार्सप्रमाणे ऑटोमॅटिक कारमध्ये वारंवार क्लच दाबण्याची आणि गिअर बदलण्याची कटकट नसते. ऑटोमॅटिक कार चालवण्याची पद्धत मॅन्युअल गाडीपेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक कार चालवताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरेच लोकं ड्रायव्हिंगदरम्यान काही अशा चूका करतात, ज्यामुळे गियरबॉक्स खराब होतो आणि गाडीचे नुकसान होऊ शकते. ऑटोमॅटिक कार चालवाताना खालील चुका टाळा.

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

गाडी चालू असताना गिअर बदलणं

ऑटोमॅटिक कार चालकांकडून केली जाणारी सर्वात सामान्य चूक म्हणजे गाडी चालू असताना गिअर बदलणं. गाडी पूर्णपणे थांबलेली नसेल तोपर्यंत गियर ड्राइव (D) हून रिवर्स (R) किंवा पार्क (P) मोडवर बदलू नका. ही चूक केल्यास गिअरबॉक्सच्या अंतर्गत भागांवर मोठा ताण येतो, ज्यामुळे गियरबॉक्स लगेच तुटू शकतात किंवा खराब होऊ शकतात. यामुळे गिअर बदलण्यापूर्वी गाडी पूर्णपणे थांबली असेल, याची खात्री करा. (फोटो सौजन्य – Pinterest)

उतारांवर न्यूट्रलचा वापर करणं

असे अनेक लोकं असतात जे माइलेज वाचण्यासाठी उतारांवर किंवा फ्लाईओवरवरून खाली येताना गाडी न्यूट्रल मोडवर सेट करतात. मात्र ही सर्वात मोठी चूक आहे. ही पद्धत केवळ नुकसानदायकच नाही तर असुरक्षित देखील आहे. गाडी न्यूट्रल मोडवर सेट केल्यास तुमचा गाडीवरील कंट्रोल कमी होतो. तसेच गियरबॉक्सला मिळणारा ऑईल सप्लाय देखील थांबतो. ज्यामुळे गिअरबॉक्सचे भाग एकमेकांवर घासले जातात, ते जास्त गरम होतात आणि नुकसान होऊ शकते.

ट्रॅफिग सिग्नलमध्ये पार्क मोड वापरणं

ट्रॅफिक सिग्नल किंवा जास्त वाहतूक कोंडी असलेल्या ठिकाणी जेव्हा गाडी थोड्या वेळासाठी थांबते, तेव्हा काही लोकं तात्काळ पार्क मोड ऑन करतात. नेहमी लक्षात ठेवा की, पार्क मोडचा वापर गाडी पूर्णपणे बंद करू एका ठिकाणी उभी करण्यासाठी केला जातो. ट्रॅफिक असलेल्या ठिकाणी जर तुम्ही वारंवार पार्क मोडचा वापर केला तर लॉकिंग पिनवर दबाव पडू शकतो. जर तुम्ही वाहतूक कोंडीत अडकला असाल, तर फक्त ब्रेक दाबून धरा किंवा गाडी N (न्यूट्रल) मध्ये टाका. वारंवार P मोड ऑन केल्यास गाडीचे नुकसान होऊ शकते.

Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत

गाडी P मोडवर सोडणं

जेव्हा तुम्ही गाडी पार्क करता तेव्हा थेट P मोड चालू करून पाय हटवणं अत्यंत चुकीची सवय आहे. यामुळे गाडीचे संपूर्ण वजन गियरबॉक्सच्या एका छोट्या भागावर पडते. गाडी पार्क करताना सर्वात आधी गाडी थांबवा, गाडीला N मोडमध्ये शिफ्ट करा, आणि नंतर हँडब्रेक लावा. जेणेकरून गाडीचे संपूर्ण वजन ब्रेकवर येईल. त्यानंतरच P मोडमध्ये शिफ्ट करा.

Web Title: Are you also planning to buy automatic car for the first time avoid these 4 mistakes otherwise gearbox will be destroyed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • auto news
  • Car tips
  • cars

संबंधित बातम्या

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग
1

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग

महिंद्राच्या SUV गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सूट; Scorpio N आणि Thar Roxx वर तब्बल ₹१.२५ लाखांपर्यंतची बचत!
2

महिंद्राच्या SUV गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सूट; Scorpio N आणि Thar Roxx वर तब्बल ₹१.२५ लाखांपर्यंतची बचत!

गाडी असावी तर सेडानसारखीच! स्कोडा इंडिया ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांची भूमिका
3

गाडी असावी तर सेडानसारखीच! स्कोडा इंडिया ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांची भूमिका

टाटा मोटर्स पुढच्या महिन्यापासून गाड्यांच्या किंमती २५,००० रुपयांपर्यंत वाढवणार! १ सप्टेंबरपासून दरात वाढ
4

टाटा मोटर्स पुढच्या महिन्यापासून गाड्यांच्या किंमती २५,००० रुपयांपर्यंत वाढवणार! १ सप्टेंबरपासून दरात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.