फोटो सौजन्य: iStock
कुठल्याही कारची ओळख ही त्याच्या लोगोवरून ठरत असते. लोगो जेवढा लोकांच्या डोळ्यात भरेल तेवढी कंपनी लोकांच्या लक्षात राहील. काही वेळेस कंपनी काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने आपल्या लोगोत बदल करत असते. अशाच एका प्रतिष्ठित कंपनीने चीनमध्ये आपला लोकप्रिय बदलला आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.
देशभरासह जगभरात ऑडी कंपनीच्या कार्सना मोठी मागणी पाहायला मिळते. अनेक सेलिब्रेटीज आणि वजनदार व्यतिमत्व आपल्या कार कलेक्शनमध्ये ऑडीच्या कार्सचा समावेश करत असतात. ऑडीच्या कार्स या आपल्या हाय परफॉर्मन्स आणि महागड्या किंमतीमुळे जास्त ओळखल्या जातात. पण आता ज्या लोगोमुळे कंपनी ओळखली जाते तोच लोगो कंपनी चीनमध्ये बदलताना दिसत आहे.
जर्मन कार उत्पादक ऑडीने चीनमध्ये आपला आयकॉनिक चार-रिंग लोगो बदलला आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावर सर्वांनाच धक्का बसला आहे. एवढेच नाही तर कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना देखील धक्का बसला आहे. खरं तर, या डिझाइनमुळे लोकांना कंपनीच्या कार्स खूप आवडतात. हा लोगो 1930 पासून लक्झरी कारचे प्रतीक आहे. पण तो नवीन E संकल्पना इलेक्ट्रिक स्पोर्टबॅकचा भाग नाही. जे या महिन्याच्या सुरुवातीला शांघायमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. गाडीच्या पुढच्या बाजूला सर्व अक्षरात ‘AUDI’ लिहिलेले होते. हे पाऊल अशा वेळी उचलण्यात आले आहे जेव्हा जग्वारच्या नवीन लोगोने सोशल मीडियावर नुकतीच खळबळ उडवून दिली होती.
आता नव्हे तर 1999 सालीच Mahindra ने बनवली होती त्यांची पहिली EV, जाणून घ्या Bijlee बद्दल
जगातील सर्वात मोठ्या कार मार्केटमध्ये तरुण ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने नवीन ऑडी लोगो देण्यात आला आहे. हा इलेक्ट्रिक वाहनांच्या सह-विकासासाठी चीनी ऑटोमेकर SAIC सह प्रकल्पाचा भाग आहे. ऑडी आणि SAIC या दोघांनीही चीनमधील बाजारपेठेतील भागीदारी परत मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, जिथे स्थानिक खेळाडू आणि परदेशी वाहन निर्माते EV- आणि हायब्रीड सेंट्रिक कंपटीटर्सकडून हार मानत आहेत.
ऑडीच्या आयकॉनिक चार रिंग्ज लोगोला विशेष ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. हा लोगो ऑडी आणि त्याच्या चार संस्थापक ब्रँडच्या स्थापनेचे प्रतीक आहे.
Nissan चा प्रवास बंद होण्याच्या वाटेवर? Renault नंतर कंपनी नवीन पार्टनरच्या शोधात
1932 मध्ये, जर्मनीच्या चार मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीजचे विलीनीकरण झाले आणि “ऑटो युनियन एजी” नावाचा नवीन गट तयार झाला. या चार कंपनीजचे चिन्ह ऑडीचे चार रिंग लोगो आहे. या चार कंपनीजचे नावे खाली दिलेले आहेत:
प्रत्येक रिंग कंपनीचे प्रतिनिधित्व करते. या कंपनीजचे विलीनीकरणाचा उद्देश त्यावेळच्या आर्थिक संकटाचा सामना करणे आणि जर्मन ऑटोमोबाईल उद्योगाला बळकटी देणे हा होता.