फोटो सौजन्य: iStock
सध्या देशभरात इलेक्ट्रिक कार्सचे वारे जोरदार वेगाने वाहत आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे अनेक ग्राहक सध्या इलेक्ट्रिक कार्सकडे आपला मोर्चा वाळवताना दिसत आहे. यामुळे इलेक्ट्रिक कार्सची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
पूर्वी अनेक ऑटो कंपनीज फक्त इंधनावर चालणाऱ्या कार्स मार्केटमध्ये आणत होत्या परंतु आज त्याच कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत आहे. नुकतेच देशात उत्तम एसयूव्ही ऑफर करणाऱ्या महिंद्राने आपल्या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही XEV 9e आणि BE 6e लाँच केले आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की महिंद्राची पहिली Electric Vehicle ही XUV 400 EV नसून एक दुसरी कार आहे जिला 1999 सालीच कंपनीने बनवले होते. चला या महिंद्राच्या पहिल्या वाहिल्या इलेक्ट्रिक वाहनाबद्दल जाणून घेऊया.
ते वर्ष 1999 होते जेव्हा बिजली कार ही महिंद्राने पहिली ईव्ही म्हणून बनवली होती. त्या काळी Mahindra rise चे एस.व्ही.नगरकर यांनी कंपनीचे पहिले इलेक्ट्रिक वाहन तयार केले होते. या तीनचाकीचे नाव बिजली असे होते.
कॅमेरात टिपली गेली आकाश अंबानींची 12 कोटी किंमतीची ‘ही’ लक्झरी कार
जरी महिंद्राने थ्री-व्हीलर सेगमेंटमध्ये यश मिळवले नसले तरी, कंपनीने 2013 मध्ये पुन्हा एकदा महिंद्रा e2O कार इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये नवीन वाहन लाँच केले. हे वाहन महिंद्राने Reva कंपनीत 55 टक्के भागीदारी घेतल्यानंतर तयार केले होते. ती शहरी इलेक्ट्रिक कार होती. परंतु Fame सारखी योजना भारत सरकारने त्या काळी आणली नाही, ज्यामुळे त्याची किंमतही खूप जास्त होती. परिणामी ही कार ग्राहकांना फारशी आवडली नाही. त्यानंतर महिंद्राने 2017 मध्ये ही कार बंद केली.
महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक सेडान कार Mahindra E Varito देखील 2016 मध्ये भारतीय बाजारात लाँच झाली होती. हे 1.45 तासांत 0-80 टक्के चार्ज केली जाऊ शकते आणि एकदा चार्ज केल्यानंतर ती 110 किलोमीटरपर्यंत चालवता येते. ही कार फक्त दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, हैदराबाद, नागपूर, जयपूर या शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते.
महिंद्राकडून सध्या फक्त एकच इलेक्ट्रिक एसयूव्ही विकली जात आहे. ज्याला Mahindra XUV 400 म्हणून ओळखले जाते. कंपनीची ही SUV अधिकृतपणे भारतीय बाजारात जानेवारी 2023 मध्ये लाँच करण्यात आली. ज्यामध्ये 375 किलोमीटरची रेंज अनेक उत्कृष्ट फीचर्ससह देण्यात आले होते. हे 15.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत दोन बॅटरी पर्यायांसह आणले होते.
XEV 9e आणि BE 6e या इलेक्ट्रिक सेगमेंटमधील सर्वोत्तम SUV म्हणून महिंद्राने लाँच केल्या आहेत. हे INGLO प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहेत, ज्यामध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, ADAS सारखी उत्कृष्ट फिचर देण्यात आले आहेत. या नवीन एसयूव्ही 20 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 20 मिनिटे घेते.