Neearj Chopra ने लाँच केली Audi RS Q8 Performance लाँच, Mercedes ला मिळणार कांटे की टक्कर Neearj Chopra ने लाँच केली Audi RS Q8 Performance लाँच, Mercedes ला मिळणार कांटे की टक्कर
जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी, ऑडीने आज (दि. 17 फेब्रुवारी 2025 ) भारतात त्यांची नवीन उच्च-कार्यक्षम लक्झरी एसयूव्ही ऑडी आरएस क्यू८ च्या लाँचची घोषणा केली. नवीन ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्स मध्ये उत्तम क्षमता आणि अत्याधुनिक लक्झरीचे परिपूर्ण संयोजन आहे, ज्यामुळे ही कार अपवादात्मक क्षमता आणि आकर्षक डिझाइनसह परफॉर्मन्स एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवीन मापदंड स्थापित करेल.
लाँचप्रसंगी ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों आणि विश्वविजेता व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा उपस्थित होते.
नवीन ऑडी आरएस क्यू८ भारतात ₹२,४९,००,००० (एक्स-शोरूम) या सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध आहे. ही कार १०-वर्ष कॉम्प्लीमेण्टरी रोडसाइड असिस्टण्सच्या ओनरशीप फायद्यासह येते. यात आकर्षक सर्वसमावेशक मेन्टेनन्स व सर्विस पॅकेजेस् देखील उपलब्ध आहेत.
ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्सचे लाँच भारतात सर्वोत्तम ऑडी परफॉर्मन्स कार्स आणण्याप्रती आमच्या कटिबद्धतेमधील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. क्षमता, अत्याधुनिकता आणि दैनंदिन उपयुक्ततेच्या प्रभावी एकत्रिकरणासह नवीन ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्स लक्झरीबाबत तडजोड न करता सर्वोत्तम कार्यक्षमतेची मागणी करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे.”
४.० लिटर व्ही८ टीएफएसआय इंजिनची शक्ती, जे ६४० एचपी शक्ती आणि ८५० एनएम टॉर्क उत्पन्न करते.
८-स्पीड टिप्ट्रॉनिक ट्रान्समिशन विनासायास पॉवर डिलिव्हरी आणि डायनॅमिक प्रतिसादासाठी.
– ० ते १०० किमी/तास गती फक्त ३.६ सेकंदांमध्ये.
– अद्वितीय हाताळणी व नियंत्रणासाठी क्वॉट्रो परमनण्ट ऑल-व्हील ड्राइव्हसह स्पोर्ट डिफेन्शियल.
– अॅपडप्टिव्ह एअर सस्पेंशन व स्पोर्ट्स राइड स्टेबिलायझेशन
– आरएस-स्पोर्ट एक्झॉस्ट सिस्टम अधिक उत्साही ड्राइविंग अनुभवासाठी.
– ऑल-व्हील स्टीअरिंग गतीत प्रभावी मनुव्हरिंग आणि आरामदायी ड्रायव्हिंग.
MG Windsor EV ला मागे टाकत भारतीय कारने रचला ईतिहास ! एका दिवसात मिळवली 8,472 करोड़ कोटींची बुकिंग
– एचडी मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्ससह ऑडी लेझर लाइट्स.
– आक्रमक डिझाइन घटक – आरएस-विशिष्ट स्टायलिंग.
– आर२३ व्हील्स ऑफर करण्यात आले आहेत.
– आरएस रूफ एज स्पॉयलर आणि आरएस स्पोर्ट एक्झॉस्ट सिस्टम.
– ब्लॅक स्टायलिंग पॅकेज व ब्लॅक स्टायलिंग पॅकेज प्लस पर्याय.
– स्टॅण्डर्ड रंग: मिथोस ब्लॅक, ग्लेशियर व्हाइट, डेटोना ग्रे, अस्कारी ब्ल्यू, चिली रेड, साखीर गोल्ड, सॅटेलाइट सिल्व्हर, वेटोमो ब्लू.
– ऑडी एक्सक्लुसिव्ह रंग: मिसानो रेड पर्ल, डीप ग्रीन पर्ल, सेपांग ब्लू पर्ल इफेक्ट, जावा ग्रीन मेटलिक.
– इंटीरिअर रंग: ब्लॅकसह विविध स्टिचिंग पर्याय.
– ४-झोन क्लायमेट कंट्रोल व एअर आयोनायझर.
– पॉवर-अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्स सह मसाज फंक्शन.
– पार्क असिस्ट प्लस व ३६०-डिग्री कॅमेरा सिस्टम.
– ऑडी फोन बॉक्स व वायरलेस चार्जिंग.
– पॅनोरॅमिक सनरूफ पर्याय.
– ऑडी व्हर्च्युअल कॉकपीटसह आरएस-विशिष्ट लेआऊट.
– प्रीमियम व्हॅल्कोना लेदर फ्रण्ट स्पोर्ट सीट्स.
– बँग अँड ओल्युफसेन ३डी प्रीमियम साऊंड सिस्टमसह १७ स्पीकर्स आणि ७३० वॅट आऊटपुट.
– लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टम.
– सहाचे एअरबॅग्ज केबिनमध्ये.
– इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल व क्रूझ कंट्रोल.
ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्स एक अत्याधुनिक लक्झरी कार असून, यामध्ये परफॉर्मन्स, कार्यक्षमता, आणि आरामदायीपणा यांचा उत्तम संगम आहे, जी भारतीय ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर ठरते.