फोटो सौजन्य: www.mahindraelectricsuv.com
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचे मुख कारण म्हणजे इंधनाच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ. येणाऱ्या भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल असे मानून अनेक कार उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक कारची निर्मिती करत आहे.
भारतात अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या इलेक्ट्रिक कारला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. यात टाटा मोटर्सपासून ह्युंदाईपर्यंतचा समावेश आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून MG Motors च्या Windsor EV ला इतर कारपेक्षा जास्त मागणी आहे. पण आता याच कंपनीला मागे टाकत महिंद्राच्या दोन इलेक्ट्रिक एसयूव्हींनी इतिहास रचला आहे. महिंद्राने इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे.
Kawasaki कडून नवीन बाईक लाँच, किंमत एवढी की दारात उभी राहील नवीन कार
महिंद्राच्या XEV 9e आणि BE6 ने बुकिंगमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. XEV 9e ने MG Windsor EV च्या पहिल्या दिवसाच्या बुकिंग रेकॉर्डला (15,000 युनिट्स) मागे टाकले आहे. कंपनीने जाहीर केले आहे की XEV 9e आणि BE6 ला फक्त एकाच दिवसात एकूण 30,791 बुकिंग मिळाले आहेत. या कालावधीत, कंपनीला 8,472 कोटी रुपयांचे बुकिंग व्हॅल्यू प्राप्त झाली आहे. या प्रचंड यशात महिंद्राचे प्रीमियम ईव्ही तंत्रज्ञान, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि अत्याधुनिक फीचर्स हे प्रमुख योगदान आहेत.
बुकिंग डेटानुसार, XEV 9e ची मागणी BE6 पेक्षा जास्त आहे. एकूण बुकिंगपैकी 56% बुकिंग XEV 9e साठी आणि 44% BE6 साठी आली. एका अहवालानुसार, महिंद्राच्या नव्याने लाँच झालेल्या इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही XEV 9e आणि BE6 ने लाँचच्या पहिल्या दिवशी 30,179 बुकिंग नोंदवून 8,472 कोटी रुपयांची विक्रमी बुकिंग व्हॅल्यू मिळवली आहे.
महिंद्राचा टॉप-एंड पॅक थ्री व्हेरियंट 73% ग्राहकांनी निवडला आहे, जो 79 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकसह येतो. यावरून हे स्पष्ट होते की ग्राहक अधिक रेंज आणि प्रीमियम फीचर्सना प्राधान्य देत आहेत.
अधिक सुरक्षितता दिलीच पण त्यासोबत किंमतही वाढवली ! Maruti ची ‘ही’ SUV झाली महाग
XEV 9e ची सुरुवातीची किंमत: 21.90 लाख
BE6 सुरुवातीची किंमत: 18.90 लाख
या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी मार्च 2025 च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होणार आहे.
कंपनीच्या मते, XEV 9e आणि BE6 च्या यशावरून असे दिसून येते की प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये भारतीय ग्राहकांची आवड वेगाने वाढत आहे. या दोन्ही एसयूव्ही “मेड इन इंडिया, फॉर द वर्ल्ड” आहेत आणि 26 नोव्हेंबर 2024 रोजी सादर करण्यात आल्या होत्या.
ग्राहकांना या कारमध्ये प्रीमियम डिझाइन आणि लक्झरी इंटिरिअर मिळते. या दोन्ही इलेक्ट्रिक कारची रेंज खूपच प्रभावी आहे. तसेच याची बॅटरी देखील पॉवरफुल आहे. त्यात उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स दिले आहेत.