फोटो सौजन्य: Freepik
भारतात नेहमीच वेगवेगळ्या सेगमेंटमधील कार्स लाँच होत असतात. यात एसयूव्हीपासून ते सेडान कारपर्यंतचा समावेश आहे. सध्या सणासुदीचा काळ चालू असल्याकारणाने भारतीय ग्राहक मोठ्या प्रमाणात कार्स विकत घेत आहेत. नुकताच एक अहवाल सादर करण्यात आला आहे, ज्यात गे;या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2024 मध्ये किती सेडान कार्स विकल्या आहेत याबद्दल माहिती देणार आली आहे.
संपूर्ण देशात मारुती सुझुकी, टाटा, ह्युंदाई आणि होंडा द्वारे कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमधील कार ऑफर केल्या जातात. चला जाणून घेऊया, ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या कॉम्पॅक्ट सेडान कारची विक्री सर्वाधिक झाली आहे.
हे देखील वाचा: Lexus कडून अचानक थांबवण्यात आली ‘या’ कारची बुकिंग, किमंत तब्बल 2 कोटी
देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुतीने आपली डिझायर ही कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये ऑफर करत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये या सेडान कारची एकूण विक्री 10627 युनिट्स झाली होती. तर मागील वर्षी याच कालावधीत या कारची एकूण विक्री 13293 युनिट्स होती. वार्षिक आधारावर या कारच्या विक्रीत सुमारे 20 टक्क्यांनी घट झाली आहे, परंतु तरीही ही कार तिच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक पसंतीची कार आहे. ही कार 6.56 लाख रुपयांपासून ते 9.38 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत ऑफर केली जाते.
दक्षिण कोरियाची ऑटोमेकर कंपनी ह्युंदाईने ऑरा ही कॉम्पॅक्ट सेडान म्हणून ऑफर केली आहे. गेल्या महिन्यात विक्रीच्या बाबतीत ही कार दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑगस्ट 2024 मध्ये या कारच्या एकूण 4304 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी 4892 युनिट्सची विक्री झाली होती. त्याची विक्री देखील वर्षाच्या आधारे 12 टक्क्यांनी घटली आहे. Aura ची एक्स-शोरूम किंमत 6.48 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारचे टॉप व्हेरिएंट 9.05 लाख रुपयांपर्यंत खरेदी केले जाऊ शकते.
Honda सुद्धा या श्रेणीत Amzae ऑफर करते. कंपनीची सर्वात स्वस्त सेडान कार असलेल्या Amaze ने ऑगस्ट 2024 मध्ये 585 युनिट्स विकल्या आहेत. गेल्या वर्षी एकूण 3564 युनिट्सची विक्री झाली होती. आकडेवारीनुसार, वार्षिक आधारावर त्याच्या विक्रीत 27 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. या कारची किंमत 7.62 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 9.13 लाख रुपयांपर्यंत जाते.
टिगोर ही कॉम्पॅक्ट सेडान म्हणून टाटाने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. वर्षाच्या आधारे या कारच्या विक्रीतही 61 टक्क्यांहून अधिक घट दिसून आली आहे. गेल्या महिन्यात एकूण 1148 युनिट्सची विक्री झाली आहे होती. तर गतवर्षी एकूण 2967 युनिटची विक्री झाली होती. या कारची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याचे टॉप व्हेरिएंट 9.40 लाख रुपयांपर्यंत खरेदी केले जाऊ शकते.