फोेटो सौजन्य: Social Media
भारतात लक्झरी कार्स नेहमीच चर्चेचा विषय असतात. आजही एखादी लक्झरी कार रस्त्यावरून जाताना दिसली की अनेकांच्या नजरा तिच्याकडे रोखल्या जातात. तसेच आपल्याकडे या लक्झरी कार्स नेते मंडळी आणि सिने कलाकार वापरताना दिसतात. ज्यांचा प्रभाव सामान्य नागरिकांवर जास्त असतो. भारतात लक्झरी कार्सची विक्री करणाऱ्या अनेक कंपनीज आहे. यातीलच एक म्हणजे लेक्सस कंपनी.
जपानी लक्झरी कार निर्माता लेक्सस भारतीय कार मार्केटमध्ये अनेक उत्तम कार आणि एसयूव्ही ऑफर करते. परंतु रिपोर्ट्सनुसार, कंपनीने आपल्या लक्झरी MPV LM350h चे बुकिंग भारतात तात्पुरते थांबवले आहे. लेक्ससने हे कोणत्या कारणांसाठी केले आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया.
हे देखील वाचा: इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचारात आहात? ‘या’ कार्सवर मिळत आहे तब्बल लाख रुपयांची सूट
अहवालानुसार, Lexus ने LM350h MPV चे बुकिंग तात्पुरते थांबवले आहे. आधीच बुक केलेल्या युनिट्सची डिलिव्हरी वेळेवर व्हावी आणि नवीन ग्राहकांना त्याच्या डिलिव्हरीसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागू नये यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
कंपनीला भारतात LM350h या कारची मोठ्या प्रमाणात बुकिंग मिळत आहे. त्यामुळे ही कार डिलिव्हर करण्यात अडचण येत होती. त्यामुळे कंपनीला या कारसाठी मिळालेल्या ऑर्डर पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. विशेष बाब म्हणजे ही कार भारतीय बाजारपेठेत मार्च २०२४ मध्येच लाँच करण्यात आली होते आणि काही काळापूर्वी त्याची डिलिव्हरी सुरू करण्यात आली होती. डिलिव्हरीनंतर, Lexus MPV रणबीर कपूर-आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अंबानी कुटुंब तसेच क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांसारख्या स्टार्सनी खरेदी केली होती. चला LM350h या लक्झरी कारचे फीचर्स जाणून घेऊया.
हे देखील वाचा: BYD eMAX 7 ची बुकिंग करणाऱ्या पहिल्या हजार ग्राहकांना मिळणार ‘हे’ स्पेशल गिफ्ट
Lexus ने LM350h मध्ये अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. काळ्या या कारमध्ये 14-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, ऍपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो समोर आहे. मागील बाजूस 23 स्पीकर्ससह 48-इंचाचा मोठा डिस्प्ले आणि ऑडिओ सिस्टीम देण्यात आली आहे. याशिवाय फोल्डेबल टेबल, व्हॅनिटी मिरर, छोटा फ्रीजही यामध्ये देण्यात आला आहे.
कंपनीने LM350 ची एक्स-शोरूम किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. तर दुसऱ्या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.