Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र होतोय ‘आत्मनिर्भर’! सुट्या भागांच्या स्थानिक उत्पादनासाठी ‘ऑटो पीएलआय’ योजनेचा निधी केला दुप्पट!

केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादनाला गती देण्यासाठी आणि परकीय देशांवरील आयातीचे अवलंबित्व कमी करण्यासाठी 'ऑटो पीएलआय' योजनेचा निधी दुप्पट करत ₹५,९४० कोटींची मोठी तरतूद केली आहे. या महत्त्वपूर्ण पावलामुळे भारतात प्रगत वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळून रोजगाराच्या लाखो नव्या संधी उपलब्ध होतील.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 16, 2026 | 07:00 AM
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र होतोय ‘आत्मनिर्भर’! सुट्या भागांच्या स्थानिक उत्पादनासाठी ‘ऑटो पीएलआय’ योजनेचा निधी केला दुप्पट!
Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र सध्याच्या घडीला एका मोठ्या परिवर्तनातून जात आहे. आपल्या देशाला जागतिक स्तरावर ऑटो मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी आणि आधुनिक वाहनांच्या निर्मितीला गती देण्यासाठी केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

ऑटो PLI योजना

सरकारने ऑटोमोबाईल आणि ऑटो घटकांसाठीच्या ‘प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ Auto PLI योजनेसाठी तब्बल ₹५,९४० कोटींची भरीव आर्थिक तरतूद केली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत हा निधी जवळपास दुप्पट करण्यात आला असून, यामुळे भारतीय वाहन उद्योगाला एक नवा बूस्टर डोस मिळाला आहे, असे म्हणायला हवे.

भविष्यातील पेट्रोल पंप! जिथे एकाच छताखाली पेट्रोल, डिझेल, सीएनजी, ईव्ही चार्जिंग आणि हायड्रोजन एकत्र मिळणार! जाणून घ्या

योजनेचा उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश भारताचे परकीय देशांवरील, विशेषतः चीनवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. आज तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरी, प्रगत ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर्स, ईव्ही बॅटरीचे सुटे भाग आणि इतर हाय-टेक घटकांसाठी भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर चीन आणि इतर आशियाई देशांतून आयात करावी लागते. या आयातीमुळे देशाचे परकीय चलन तर खर्च होतेच, शिवाय सप्लाय चेनमध्ये अडथळे निर्माण झाल्यास देशातील उत्पादनाला मोठा फटका बसतो.

योजनेच्या निधिमुळे मिळालेले आर्थिक सहाय्य

सरकारच्या या नव्या निधीमुळे कंपन्यांना भारतातच प्रगत तंत्रज्ञानाचे सुटे भाग बनवण्यासाठी मोठे आर्थिक प्रोत्साहन मिळणार आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत हे सुटे भाग भारतात तयार झाल्यास आयातीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल.

हायवेवर डुलकी लागताच वाजणार अलार्म! ट्रक-बस ड्रायव्हर्सच्या डोळ्यांवर आता कॅमेऱ्याचा वॉच! ‘स्लीप डिटेक्शन’ तंत्रज्ञान अपघातांना ला

स्थानिक उत्पादन आणि रोजगाराच्या संधी

स्थानिक उत्पादनाला चालना मिळाल्यामुळे देशात रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण होणार आहेत. नवीन कारखाने, संशोधन केंद्रे आणि प्रकल्पांमुळे केवळ ऑटोमोबाईल क्षेत्रातील इंजिनिअरचं नव्हे, तर टेक्निकल स्कील असलेल्या हजारो तरुणांना थेट रोजगार मिळेल. तसेच, या मोठ्या प्रकल्पांना कच्चा माल पुरवणाऱ्या छोट्या आणि मध्यम उद्योगांचा देखील वेगाने विकास होईल,

आव्हानात्मक कार्य

परंतु, भारतातच हे प्रगत सुटे भाग बनवणे हे एक मोठे आव्हान देखील आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि सातत्यपूर्ण वीज-पाणी पुरवठ्याची गरज आहे. जागतिक कंपन्यांशी स्पर्धा करताना दर्जा आणि किंमत या दोन्ही बाजूनी भारतीय उत्पादकांना स्वतःला सिद्ध करावे लागेल.

केंद्र सरकारची ही ऑटो पीएलआय योजना भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे आणि धाडसी पाऊल आहे. आव्हाने नक्कीच आहेत, परंतु ₹५,९४० कोटींच्या या आर्थिक पाठबळामुळे भारतीय ऑटोमोबाईल उद्योग आयातीचे चक्र तोडून जागतिक बाजारात एक प्रमुख निर्यातदार देश म्हणून नक्कीच पुढे येईल.

Web Title: Auto pli scheme automobile news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Vinfast Grand  Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
1

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

टीव्हीएस Maxi Scooter 160 चे मायलेज किती? किंमत आणि खासियत जाणून घ्या
2

टीव्हीएस Maxi Scooter 160 चे मायलेज किती? किंमत आणि खासियत जाणून घ्या

2026 TVS Ronin, Apache RTR 160 4V, RTR 200 4V आणि RTR 310 अपडेटसह लाँच; पाहा नव्या बाइक्समध्ये काय बदलले!
3

2026 TVS Ronin, Apache RTR 160 4V, RTR 200 4V आणि RTR 310 अपडेटसह लाँच; पाहा नव्या बाइक्समध्ये काय बदलले!

Toyota Land Cruiser300 हायब्रिड आली समोर! 457 PS पॉवरसह दमदार SUV, पेट्रोल V6 इंजिनला रामराम!
4

Toyota Land Cruiser300 हायब्रिड आली समोर! 457 PS पॉवरसह दमदार SUV, पेट्रोल V6 इंजिनला रामराम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.