फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात ज्याप्रमाणे दुचाकींची विक्री झपाट्याने वाढताना दिसत आहे, त्याचप्रमाणे ग्लोबल मार्केटमध्ये देखील दुचाकीला चांगली मागणी मिळत आहे. विदेशात अनेक उत्तम भारतीय दुचाकी उत्पादक कंपन्या कार्यरत आहे. त्यातीलच एक कंपनी म्हणजे बजाज ऑटो. बजाज ऑटो देशभरासह जगभरात उत्तम बाईक स्कूटर ऑफर केल्या आहेत. मागच्याच वर्षी म्हणजेच 2024 मध्ये कंपनीने जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच केली होती. कंपनीच्या विक्रीत सुद्धा आता कमालीची वाढ पाहायला मिळत आहे.
मार्च 2025 मध्ये बजाजने 1,32,073 युनिट्सची निर्यात केली, जी मार्च 2024 मधील 1,30,881 युनिट्सपेक्षा जास्त आहे. परंतु, यासोबतच देशांतर्गत बाजारात दुचाकी विक्रीतही घट झाली आणि मार्च 2024 मधील 1,83,004 युनिट्सवरून ती 1,32,073 युनिट्सवर आली. बजाजने असेही म्हटले आहे की या आकडेवारीत बजाज ऑटो टेक्नॉलॉजी लिमिटेड (पूर्वीचे चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेड) ची विक्री देखील समाविष्ट आहे.
ग्राहकांची ‘या’ कंपनीच्या टू-व्हिलर्सला भरभरून मागणी, तब्बल 12.56 लाख बाईक्सची रेकॉर्डब्रेक विक्री
परंतु, जर आपण संपूर्ण आर्थिक वर्षाबद्दल बोललो तर, बजाज ऑटोने एप्रिल 2024 ते मार्च 2025 दरम्यान 16,74,060 युनिट्सची निर्यात केली, जी एप्रिल 2023 ते मार्च 2024 च्या तुलनेत 14,77,338 युनिट्सपेक्षा जास्त होती. ही तब्बल 33 टक्क्यांची वाढ दर्शवते.
कंपनीने देशांतर्गत बाजारात गेल्या वर्षी 22,50,585 युनिट्सच्या तुलनेत 23,08,249 युनिट्सची विक्री केली. यावरून असे दिसून येते की मार्च 2025 मध्ये विक्री स्थिर राहिली असली तरी, कंपनीने संपूर्ण आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली.
अलिकडेच, बजाज ऑटोने त्यांच्या पल्सर सिरीजच्या 2 कोटी युनिट्सची विक्री करत, एक नवीन टप्पा घातला आहे. हा क्षण साजरा करण्यासाठी, कंपनीने त्यांच्या काही मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट जाहीर केल्या आहेत. त्याची माहिती आपण जाणून घेऊया.
‘या’ ऑटो कंपनीची कामगिरीच भारी ! 70 देशांमध्ये निर्यात केल्या 6 लाखांपेक्षा जास्त Made In India कार
बजाज कंपनी आपल्या विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती देत आहे. बजाज पल्सर 125 निऑनवर रु. 1,184, तर बजाज पल्सर 125 कार्बन फायबरवर रु. 2,000 इतकी सवलत मिळत आहे. याशिवाय, बजाज पल्सर 150 सिंगल डिस्क आणि ट्विन डिस्क या दोन्ही मॉडेल्सवर रु. 3000 ची सूट दिली जात आहे. बजाज पल्सर एन१६० वर रु. 5,811 इतकी सवलत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, बजाज पल्सर 220F वर रु. 7,379 एवढी सवलत दिली जात आहे, जी महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमध्येच लागू असणार आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठीच असणार आहे.