फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, त्यातीलच एक कंपनी म्हणजे सुझुकी मोटरसायकल इंडिया. ही कंपनी देशातील ग्राहकांच्या मागणी आणि आवडीनुसार बेस्ट बाईक्स आणि स्कूटर ऑफर करण्याचा प्रयत्न करत असते. नुकतेच कंपनीचा मार्च 2025 सेल्स रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. यात कंपनीची दमदार सेल्स दिसून आली आहे. कंपनीने दुचाकी विक्रीमध्ये एक नवीन माइलस्टोन गाठला आहे. परंतु, कंपनीच्या निर्यातीत थोडी घाट आल्याचे दिसून आले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
मालक असावा तर असा ! कामगारांनी टार्गेट पूर्ण केल्यामुळे मालकाने प्रत्येकाला दिली SUV कार
मार्च 2025 चा महिना सुझुकीसाठी खूप खास ठरला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 12,56,161 युनिट्सची विक्री नोंदवली गेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 10.78 टक्क्यांची वाढ झाली आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की सुझुकीने वर्षभरात 1,22,259 युनिट्सची अतिरिक्त विक्री केली आहे.
कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Access 125,Burgman Street 125 आणि Avenis 125 स्कूटर्स तसेच Gixxer, Gixxer SF आणि व्ही-स्ट्रॉम एसएक्स बाईक्सचा समावेश आहे, ज्यांना भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मार्च 2025 मध्ये एकूण 1,25,930 युनिट्स विकल्या गेल्या, जे 2024 च्या तुलनेत फार जास्त आहे. कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 21.47 टक्क्याने जास्त दुचाकींची विक्री केली आहे. यामध्ये देशांतर्गत बाजारात 1,05,736 युनिट्स विकल्या गेल्या, तर 20,194 युनिट्स निर्यात करण्यात आल्या. देशांतर्गत बाजारपेठेत सुझुकीच्या विक्रीत वार्षिक तुलनेत 22.71 टक्क्याने वाढ झाली, तर निर्यातीत 15.36 टक्क्याने वाढ झाली.
फेब्रुवारी 2025 ची तुलना जर मार्च 2025 सोबत केली तर सुझुकीच्या एकूण विक्रीत 39.6 टक्क्याने वाढ झाली. देशांतर्गत बाजारपेठेत 32,281 युनिट्सच्या अतिरिक्त विक्रीसह 43.95% ची महिना दर महिना वाढ दिसून आली आहे. निर्यात 20.55% ने वाढली, म्हणजेच 3,443 अधिक युनिट्स विकल्या गेल्या. एकूणच, फेब्रुवारी 2025 च्या तुलनेत मार्च 2025 मध्ये सुझुकीने 35,724 युनिट्स अधिक विकल्या.
सुझुकी मोटरसायकल इंडियाचे विक्री आणि विक्रीनंतरचे ऑपरेशन्स मॅनेजर मिसुमोतो वाताबे म्हणाले की, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 12.56 लाख युनिट्सची विक्रमी विक्री गाठण्यास मदत करणाऱ्या आमच्या ग्राहकांचे, डीलर भागीदारांचे आणि टीम सदस्यांचे आम्ही आभारी आहोत. मागील 4 वर्षात आमची विक्री दुप्पट झाली आहे, जी आमच्या ब्रँडवरील ग्राहकांचा वाढता विश्वास दर्शवते.
सुझुकी नवीन आर्थिक वर्षात त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Suzuki e-ACCESS लाँच करण्याच्या तयारीत आहे.