'या' ऑटो कंपनीची कामगिरीच भारी ! 70 देशांमध्ये निर्यात केल्या 6 लाखांपेक्षा जास्त Made In India कार
भारतात ज्याप्रमाणे चांगल्या कार्सला मागणी असते, त्याचप्रमाणे विदेशात सुद्धा कार्सना मागणी असते. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपन्या भारतात आपल्या कार उत्पादित करतात आणि त्या बाहेरील देशात निर्यात करतात. यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील उत्तम चालना मिळते.
नुकतेच स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला मुंबई बंदर प्राधिकरणाने ‘टॉप एक्सपोर्टर 2023-2024’ म्हणून मान्यता दिली आहे. या कंपनीने आजवर 675,000 पेक्षा जास्त कार्स निर्यात केल्या आहेत. 2023 मध्ये या कंपनीने विक्रमी 38 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली होती आणि त्यात निर्यातीचे प्रमाण एकूण उत्पादनाच्या 30% इतके होते. मागील वर्षात म्हणजेच 2024 मध्ये 20% वार्षिक वाढ झाली असून स्थानिक पातळीवर उत्पादित वाहनांमध्ये निर्यातीचा वाटा 40% होता.
मालक असावा तर असा ! कामगारांनी टार्गेट पूर्ण केल्यामुळे मालकाने प्रत्येकाला दिली SUV कार
2023-2024 मध्ये कंपनीने एशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील 26 पेक्षा जास्त देशांमध्ये स्थानिक स्तरावर निर्मित 43000 पेक्षा जास्त कार्स निर्यात केल्या. फॉक्सवॅगन व्हेंटो आणि पोलो या प्रसिद्ध मॉडेल्सपासून ते फॉक्सवॅगन व्हर्टस, फॉक्सवॅगन टाईगुन आणि स्कोडा कुशॅक या नव्या काळाच्या मॉडेल्सपर्यंत कंपनीने मेड इन इंडिया कार्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले आहे.
स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनिजिंग डायरेक्टर आणि सीईओ पियुष अरोरा याविषयी म्हणतात की, “हा पुरस्कार प्राप्त करताना आमहाला अभिमान वाटत आहे. हा पुरस्कार गुणवत्ता आणि इनोव्हेशनप्रती आमच्या अढळ वचनबद्धतेची आणि भारतात डिझाईन करून उत्पादन केलेल्या कार्सच्या जगातील स्तरावरील वाढत्या उपस्थितीची साक्ष देतो.”
ग्राहकांची ‘या’ कंपनीच्या टू-व्हिलर्सला भरभरून मागणी, तब्बल 12.56 लाख बाईक्सची रेकॉर्डब्रेक विक्री
आपल्या विस्तारित एक्स्पोर्ट धोरणाचा एक भाग म्हणून स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन कंपनी आपल्या पुण्यातील पार्ट्स एक्स्पीडिशन सेंटरमधून व्हिएतनामला कारचे पार्टस देखील निर्यात करत आहे, ज्यामुळे त्या प्रांतात स्थानिक वाहन असेंबली करण्यास मदत होऊ शकेल.
देशांतर्गत ईकोसिस्टम विकसित करण्यावर, स्थानिक प्रतिभेस वाव देण्यावर आणि देशात चालणारी व जगभरात वाखाणली जाणारी जागतिक दर्जाची, उच्च गुणवत्तेची वाहने विकसित करण्यावर कंपनी विशेष भर देत आहे.