Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पल्सर प्रेमींसाठी मोठी बातमी! बजाज लवकरच लाँच करणार १२५ ते १६० सीसी सेगमेंटमधील नवीन बाइक्स; जाणून घ्या डिटेलमध्ये

पुढील २-३ महिन्यांत येणाऱ्या या गाड्यांमध्ये नवीन चेसिस, मोनोशॉक सस्पेंशन, डिजिटल क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि सुधारित इंजिन ट्यूनिंग मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच कंपनी चेतकचे नवीन व्हेरियंट्स आणि एक नवीन ड्यूअल-स्पोर्ट ॲडव्हेंचर बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 24, 2026 | 07:52 PM
पल्सर प्रेमींसाठी मोठी बातमी! बजाज लवकरच लाँच करणार १२५ ते १६० सीसी सेगमेंटमधील नवीन बाइक्स; जाणून घ्या डिटेलमध्ये
Follow Us
Follow Us:
  • बजाज ऑटो पुढील २-३ महिन्यांत १२५ ते १६० सीसी सेगमेंटमध्ये नवीन व अपडेटेड पल्सर बाइक्स लाँच करणार आहे.
  • या गाड्यांमध्ये नवीन चेसिस, रियर मोनोशॉक सस्पेंशन, डिजिटल क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि उत्तम मायलेज मिळणार आहे.
  • चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन व्हेरियंट्स आणि एक नवीन ड्यूअल-स्पोर्ट ॲडव्हेंचर बाईक लाँच करण्याची तयारीही सुरू आहे.

बजाज ऑटोने पहिल्या तीन महिन्यातच ताबडतोड कमाई आणि स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये तुफान वाढ नोंदवल्यानंतर आता १२५ ते १६० सीसी सेगमेंटमध्ये नवीन मोटरसायकल्स लाँच करण्याची घोषणा केली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत या नवीन गाड्या बाजारात दाखल होण्याची शक्यता असून, कंपनी आपल्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओचा मोठा विस्तार करण्याच्या तयारीत आहे.

पल्सर सीरिजमध्ये होणार मोठे डिझाइन आणि मेकॅनिकल बदल

जरी कंपनीने गाड्यांच्या नावांची ऑफिशल घोषणा केली नसली, तरी नवीन पल्सर मॉडेल्स या लाँचिंगमध्ये आघाडीवर असतील हे नक्की. पुढील काही महिन्यांत सर्वात आधी नेक्स्ट-जनरेशन पल्सर १२५ लाँच होण्याचा अंदाज आहे. रस्त्यांवर चाचणीदरम्यान दिसलेल्या या बाईकमध्ये नव्याने डिझाइन केलेले चेसिस, मध्यभागी बसवलेले रियर मोनोशॉक सस्पेंशन आणि सिंगल तसेच स्प्लिट-सीट असे पर्याय दिसून आले आहेत.

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! Bajaj Auto ने महसूल आणि निर्यातीत रचला नवा इतिहास

यासोबतच नवीन पल्सर १२५ आणि १५० मॉडेल्समध्ये एलईडी हेडलाईट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखे आधुनिक फीचर्स मिळण्याची दाट शक्यता आहे. इंजिन ट्यूनिंगमधील सुधारणांमुळे या गाड्यांमध्ये उत्तम टॉर्क, कमी कंपन आणि अधिक मायलेज मिळेल.

पहिल्या तिमाहीत बजाजची विक्रमी आर्थिक कामगिरी

पल्सर रेंजमधील सातत्यपूर्ण अपडेट्समुळे एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीला मोठा आर्थिक फायदा झाला आहे. या कालावधीत एंट्री-लेव्हल स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये वर्षभरात तब्बल ५० टक्क्यांची वाढ झाली असून, बजाजने आपला बाजारातील वाटा लक्षणीयरीत्या वाढवला आहे. कंपनीचा एकूण महसूल ३७ टक्क्यांनी वाढून १७,२४४ कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे, ज्यामुळे कंपनीला नव्या गाड्यांच्या विस्तारासाठी मोठे पाठबळ मिळाले आहे.

बजाज ‘एम-८०’ ची यशोगाथा! मध्यमवर्गीयांच्या प्रगतीचे चाक आणि ग्रामीण भारताची ‘लाईफलाईन’!

इलेक्ट्रिक व्हेरियंट्स आणि नवीन ॲडव्हेंचर बाईकचे नियोजन

बजाजच्या एकूण दुचाकी विक्रीत सध्या ‘चेतक’सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचा वाटा जवळपास २० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, आणि येत्या काळात चेतकचे आणखी नवीन व्हेरियंट्स बाजारात आणण्याची योजना आहे. याशिवाय, बजाज एका नवीन ड्यूअल-स्पोर्ट ॲडव्हेंचर बाईकच्या निर्मितीवर वेगाने काम करत असून, ही बाईक ऑफ-रोडिंग आणि लांब पल्ल्याच्या प्रवासाची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी लवकरच सादर केली जाऊ शकते.

Web Title: Bajaj new pulsar 125 160cc launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj Auto
  • Bikes

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.