फोटो सौजन्य: @ramaswami120 (X.com)
भारतीय मार्केटमध्ये नेहमीच बजेट फ्रेंडली बाईक्सना जोरदार मागणी मिळताना दिसते. खरंतर प्रत्येक भारतीय ग्राहकांची हीच इच्छा असते की त्यांच्या बाईकने चांगला मायलेज द्यावा. ग्राहकांची हीच आवश्यकता लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये चांगल्या मायलजे देणाऱ्या बाईक ऑफर करत असतात. तसेच त्यांची किंमत देखील स्वस्त ठेवली जाते.
जर तुम्ही सुद्धा एका बजेट फ्रेंडली किमतीत उत्तम बाईकच्या शोधात असाल तर Bajaj Platina 100 तुमच्यासाठी एक योग्य पर्याय ठरू शकतो. ही बाईक तुम्ही लोनवर देखील खरेदी करू शकतात. चला या बाईकच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.
ग्लोबल मार्केटमध्ये ‘या’ Powerful Bike चा नुसता टेरर ! भारतात किंमत 22.5 लाखांवर
राजधानी दिल्लीमध्ये बजाज प्लॅटिना 100 बाईकची एक्स-शोरूम किंमत 68,890 रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत सुमारे 85000 रुपये आहे. एक्स-शोरूम किंमतीव्यतिरिक्त, त्यात आरटीओ फी आणि विमा रक्कम देखील समाविष्ट आहे. ही बजाज बाईक खरेदी करण्यासाठी, जर तुम्ही 5000 रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला बँकेकडून 80000 रुपयांचे बाईक लोन घ्यावे लागेल. ही लोनची रक्कम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते.
जर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने बाईक लोन मिळेल. जर तुम्हाला 3 वर्षांसाठी लोन मिळाले तर तुम्हाला दरमहा सुमारे 2800 रुपयांचा EMI भरावा लागेल. या संपूर्ण कालावधीत तुम्हाला सुमारे 22 हजार रुपयांचा व्याज द्यावा लागेल.
कंपनीने बजाज प्लॅटिना 100 मध्ये 102 सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन 7.9 पीएस च्या कमाल पॉवरसह 8.3 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकचे वजन सुमारे 117 किलो आहे. या बाईकमध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. तसेच, यात 11 लिटरचे फ्युएल टॅंक देखील दिले आहे. तसेच, बाईकला डीआरएल, स्पीडोमीटर, इंधन गेज, टॅकोमीटर, अँटी-स्किड ब्रेकिंग सिस्टम आणि 200 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देखील आहे.
अरे देवा ! देशातील सर्वात स्वस्त EV आता झाली महाग, July 2025 द्यावे लागेल ‘एवढे’ अतिरिक्त पैसे
बाजारात, ही बाईक टीव्हीएस स्पोर्ट्स, होंडा शाइन आणि हिरो स्प्लेंडर प्लस सारख्या बाईक्सना थेट स्पर्धा देते. त्याच वेळी, ही देशातील सर्वोत्तम मायलेज असलेल्या बाईकपैकी एक आहे. जर तुम्ही या बाईकची 11 लिटरची फ्युएल टॅंक फुल्ल केले तर तुम्हाला सुमारे 800 किमीची रेंज मिळू शकते.