फोटो सौजन्य: @GuruPolemico (X.com)
भारतीय मार्केटमध्ये बाईक्सच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. यातही आजचा ग्राहक आकर्षक लूक असणाऱ्या बाईकला जास्त प्राधान्य देत असतात. ग्राहकांची हीच मागणी, लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पदक कंपन्या मार्केटमध्ये दमदार बाईक ऑफर करत असतात.
बजाजने सुद्धा मार्केटमध्ये अनेक बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत. यातही बजाजच्या पल्सर बाईक्सला सर्वात जास्त डिमांड मिळते. मात्र, अशातच कंपनीने आपली एक लोकप्रिय बाईकचे प्रोडक्शन बंद केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून, पल्सर सिरीजने प्रीमियम कम्युटर सेगमेंटमध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे, परंतु या सिरीजतील एक बाईक, Pulsar N150, आता कंपनीच्या वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली आहे. त्यानंतर प्रश्न उद्भवतो की बजाजने ती कायमची बंद केली आहे की कंपनी लवकरच अपडेटेड मॉडेल आणण्याची तयारी करत आहे? चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
महिंद्रातर्फे XUV 3XO REVX सिरीज लाँच, प्रीमियम फीचर्ससह मिळणार दमदार परफॉर्मन्स
बजाजच्या पल्सर लाइनअपमध्ये 150cc सेगमेंटमध्ये क्लासिक पल्सर 150 आणि पल्सर एन150 ही दोन मॉडेल्स होती. कंपनीने क्लासिक मॉडेलला स्पोर्टी पर्याय म्हणून Pulsar N150 सादर केले होते. त्याला पल्सर N160 चे डिझाइन आणि लूक देण्यात आला. मात्र, या बाईकच्या विक्रीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की कंपनीला हवे असलेले यश मिळाले नाही.
मे 2025 मध्ये, बजाजने 150 सीसी पल्सरच्या एकूण 15,937 युनिट्स विकल्या, ज्यामध्ये क्लासिक आणि N150 दोन्ही समाविष्ट होते, तर मे 2024 मध्ये हा आकडा 29,386 युनिट्स होता. हे पाहता असे म्हणता येईल की एका वर्षात त्याची विक्री निम्मी कमी झाली. त्या तुलनेत, 160 सीसी पल्सर (N160 आणि NS160) ची विक्री 22,372 युनिट्सवर आली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 25% वाढ आहे. यावरून हे स्पष्ट होते की लोकांना 160 सीसी बाईक जास्त आवडत आहेत.
विद्यार्थी, व्यावसायिक व गिग वर्कर्ससाठी बेस्ट स्कूटर मिळाली ! सुरवातीची किंमत फक्त 54000 रुपये
बजाज ऑटोकडून अद्याप Pulsar N150 कायमची बंद करण्यात आल्याचे कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. हे खरे आहे की वेबसाइटवरून ही बाईक हटवण्यात आले आहे. मात्र, लवकरच त्याचे नवीन अपडेटेड व्हर्जन देखील लाँच होऊ शकते.