विद्यार्थी, व्यावसायिक व गिग वर्कर्ससाठी बेस्ट स्कूटर मिळाली !
भारतामध्ये सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड्सपैकी एक असलेल्या झेलीओ ई-मोबिलिटीने त्यांच्या लोकप्रिय लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ईव्हाच्या फेसलिफ्ट मॉडेल 2025 च्या अधिकृत लाँचची घोषणा केली आहे. ही स्कूटर आजच्या धावपळीच्या शहरी जीवनशैलीसाठी नव्याने डिझाइन करण्यात आली असून, ती अधिक राइडिंग कम्फर्ट, सुधारित परफॉर्मन्स आणि आधुनिक वापरकर्त्याच्या आवश्यक गरजांशी सुसंगत फीचर्ससह सज्ज आहे. विद्यार्थ्यांपासून ते गिग वर्कर्सपर्यंत, ही स्कूटर सर्वांसाठी उपयुक्त ठरेल, असे कंपनीने सांगितले आहे.
नवीन ईव्हा तीन वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे, जी विविध बॅटरी क्षमतेनुसार उपलब्ध आहे. लिथियम-आयन बॅटरी व्हेरिएंटमध्ये ६०व्ही/३०एएच मॉडेलला ९० किमी रेंज मिळते आणि त्याची किंमत ६४,००० रुपये आहे. दुसरे व्हेरिएंट ७४व्ही/३२एएच असून, ते १२० किमी रेंज प्रदान करते आणि त्याची किंमत ६९,००० रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय, जेल बॅटरी व्हेरिएंट्स देखील उपलब्ध असून, ६०व्ही/३२एएच मॉडेल ८० किमी रेंजसह ५०,०००, तर ७२व्ही/४२एएच व्हेरिएंट १०० किमी रेंजसह ५४,००० मध्ये मिळतो.
टेस्टिंग दरम्यान पुन्हा स्पॉट झाली इलेक्ट्रिक Mahindra XUV700, लवकरच होणार लाँच
या स्कूटरचा टॉप स्पीड २५ किमी/तास आहे, तर एकाच चार्जवर ती १२० किलोमीटर पर्यंतची रेंज देते. स्कूटरमध्ये ६०/७३व्ही बीएलडीसी मोटर देण्यात आलेला असून, ती केवळ १.५ युनिट वीज वापरते. यामध्ये १५० मिमी ग्राउंड क्लिअरन्स, ८५ किलो एकूण वजन आणि १५० किलो पेलोड क्षमतेसह ती दैनंदिन शहरी गरजांसाठी योग्य ठरते. चार्जिंग वेळ बॅटरी व्हेरिएंटनुसार बदलते– लिथियम आयन मॉडेल्स ४ तासांत तर जेल बॅटरी मॉडेल्स ८-१० तासांत पूर्ण चार्ज होतात.
कंपनीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कुणाल आर्य म्हणाले, “ईव्हा हा आमचा सर्वाधिक विकला जाणारा मॉडेल आहे. फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये आम्ही रायडरचा अनुभव अधिक आरामदायक, सुरक्षित आणि स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे लक्ष्य शहरांमध्ये परवडणारी आणि टिकाऊ ई-मोबिलिटी उपलब्ध करून देणे आहे.
2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास Maruti Grand Vitara चा किती असेल EMI?
फेसलिफ्टेड ईव्हामध्ये ड्रम ब्रेक्स (समोरील व मागील दोन्ही चाकांवर), ९०/९०-१२ टायर्ससह १२ इंच व्हील्स, आणि हायड्रॉलिक शॉक ॲब्जॉर्बर्स यामुळे राइड अधिक सुसाट आणि आरामदायक होते. डिजिटल डिस्प्ले, डीआरएल्स, कीलेस स्टार्ट, अँटी-थेफ्ट अलार्म, पार्किंग गियर, यूएसबी चार्जिंग आणि पॅसेंजर फूटरेस्ट यासारखी स्मार्ट फीचर्सही देण्यात आली आहेत. ही स्कूटर निळा, पांढरा, राखाडी आणि काळा या रंगांमध्ये उपलब्ध आहे, जे ग्राहकांना नवीन अनुभवासोबत ओळखीचा विश्वासही प्रदान करते.