
अँटी-टॉपल तंत्रज्ञान ठरते खास
BeiGo X4 मध्ये कंपनीचे खास अँटी-टॉपल टिल्टिंग तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. राइडर वळताना वाहनाचा वरचा भाग त्याच दिशेने नैसर्गिकरित्या झुकतो, तर मागील दोन चाके अतिरिक्त पकड आणि स्थिरता देतात. त्यामुळे कमी वेगात वळणे तसेच खराब, खड्डेमय किंवा ओलसर रस्त्यांवर वाहन नियंत्रित करणे तुलनेने सोपे होण्याचा दावा कंपनीने केला आहे.
ह्युंदाईने दिल्लीत उघडले 120 kW चार्जिंग स्टेशन; ईव्ही मालकांना मिळणार खास ऑफर
100Km रेंज, 100 मिनिटांत चार्जिंग
BeiGo X4 ची IDC-सर्टिफाइड रेंज 100Km आहे. यात कंपनीचे HomeSwft 72V आर्किटेक्चर देण्यात आले असून घरच्या वीज कनेक्शनवरून बॅटरी चार्ज करण्यासाठी सुमारे 100 मिनिटे लागतात, असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे रोजच्या शहरातील प्रवासासाठी हे वाहन उपयोगी ठरू शकते.
पहिल्या 300 ग्राहकांसाठी मोठी ऑफर
या इलेक्ट्रिक ट्राइकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹1.25 लाख ठेवण्यात आली आहे. मात्र ही किंमत केवळ पहिल्या 300 ग्राहकांसाठी इन्व्हाइट-ओन्ली प्रोग्रामअंतर्गत लागू असेल. त्यानंतर किंमत ₹1.56 लाख होणार आहे. कंपनीचे चालू आर्थिक वर्ष संपेपर्यंत 1,000 युनिट्स वितरित करण्याचे लक्ष्य आहे.
EV ची बॅटरी 20 वर्षे टिकू शकते का? कंपन्या बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी काय करत आहेत? जाणून घ्या
BeiGo X4 मध्ये ट्रिपल-डिस्क कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS) देण्यात आली आहे. वाहनाच्या विकासासाठी कंपनीने 5 वर्षांहून अधिक संशोधन केले असून 50 पेक्षा जास्त प्रोटोटाइप आणि सुमारे 1.5 लाख किलोमीटर रिअल-वर्ल्ड टेस्टिंग केल्याचे सांगितले आहे. वाहनाला ICAT आणि ARAI प्रमाणपत्रे मिळाली असून बॅटरी AIS-156 सुरक्षा मानकांनुसार तयार करण्यात आली आहे.