फोटो सौजन्य: Gemini
सध्या 350cc सेगमेंट केवळ पॉवरपुरते मर्यादित न राहता, डेली कम्यूटपासून ते लांब पल्ल्याच्या राईडसाठी आदर्श मानले जाते. Royal Enfield, Jawa आणि Honda यांसारख्या विश्वासार्ह कंपन्या या सेगमेंटमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक्स ऑफर करत आहेत. चला देशातील सर्वात स्वस्त स्वस्त 350cc बाईक्सबद्दल जाणून घेऊयात.
Royal Enfield Hunter 350 ही सध्या देशातील सर्वात परवडणारी 350cc बाईक मानली जाते. या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.38 लाख रुपये आहे. यात 349cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन स्मूथ परफॉर्मन्ससोबत सुमारे 36 kmpl मायलेज देते. हलके वजन आणि सोपी हँडलिंग यामुळे ही बाईक शहरातील ट्रॅफिकसाठी विशेषतः तरुण आणि ऑफिसला जाणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरते.
Royal Enfield Bullet 350 ही तिच्या खास थंप साउंड आणि मजबूत बॉडीसाठी ओळखली जाते. सुमारे 1.60 लाख रुपये किमतीपासून सुरू होणारी ही बाईक देखील 349cc इंजिनसह येते आणि जवळपास 37 kmpl मायलेज देते. याचा क्लासिक लूक आजही गाव आणि शहर दोन्हीकडे लोकप्रिय आहे.
Jawa 42 जरी 295cc इंजिनसह येत असली, तरी परफॉर्मन्सच्या बाबतीत ती अनेक 350cc बाईक्सना कडवी टक्कर देते. या बाईकची सुरुवातीची किंमत सुमारे 1.61 लाख रुपये आहे. स्टायलिश डिझाइन, जलद पिकअप आणि सुमारे 32 kmpl मायलेज ही या बाईकची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
20 मिनिटात 80% चार्ज आणि 810 किमीची तुफान रेंज! ‘या’ देशात नवीन Volvo EX60 सादर
Royal Enfield Classic 350 ही तिच्या आरामदायक राईडिंग अनुभव आणि आयकॉनिक डिझाइनमुळे देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक्सपैकी एक आहे.
दुसरीकडे, Honda H’ness CB350 ही बाईक स्मूथ इंजिन, 42 kmpl पर्यंतचे उत्कृष्ट मायलेज आणि आधुनिक हाय-टेक फीचर्समुळे विशेष ओळख निर्माण करते.






