
फोटो सौजन्य: Gemini
Hero Glamour X 125 ने 125 सीसी सेगमेंटला पुन्हा एकदा नवीन रूप दिले आहे. ही बाईक कम्युटर आणि स्पोर्टी डिझाइनचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. यात 124.7cc सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 11.34 बीएचपी आणि 10.5 एनएम टॉर्क निर्माण करते. ही बाईक 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. ज्याचे मायलेज सुमारे 65 किमी प्रति लिटर आहे.
नवीन वर्षात कार मालकांना अच्छे दिन? CNG चे भाव ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता
विशेष फीचर्समध्ये 5-इंच रंगीत एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, मल्टीपल राइड मोड आणि सेगमेंट-फर्स्ट क्रूझ कंट्रोल यांचा समावेश आहे. ही बाईक स्मार्ट फीचर्ससह मायलेज हवी असलेल्यांसाठी आहे.
2025 साठी Hero Xtreme 125R मध्ये मोठे अपडेट्स मिळाले आहेत, ज्यामुळे ती स्पोर्टी कम्युटर म्हणून आणखी आकर्षक बनली आहे. ही 124.7cc इंजिनने सुसज्ज आहे, जे Glamour X 125 प्रमाणेच पॉवर आउटपुट देते. यात ऑल-एलईडी लाइटिंग, एलसीडी डिजिटल कन्सोल, कनेक्टिव्हिटी फीचर्स, क्रूझ कंट्रोल आणि ड्युअल-चॅनेल एबीएस आहेत. ही बाईक विशेषतः तरुण रायडर्ससाठी डिझाइन केलेली आहे.
भारतीय बाजारपेठेतील बजाज पल्सर 150 ही सर्वात लोकप्रिय स्पोर्टी कम्युटर बाईक्सपैकी एक आहे. 2025 मध्ये त्यात किरकोळ पण महत्त्वाचे अपडेट्स दिले. याच्या नवीन बदलांमध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी टर्न इंडिकेटर, नवीन रंग पर्याय आणि रिफ्रेश केलेले ग्राफिक्स यांचा समावेश आहे. किमती 1.08 लाख रुपयांपासून सुरू होतात आणि 1.15 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत जातात.
Nissan च्या पाठोपाठ 2026 मध्ये ‘या’ कंपनीच्या कार देखील महाग होण्याची शक्यता
होंडा CB125 हॉर्नेट बाईक तिच्या दमदार हार्डवेअर आणि प्रीमियम फीलसाठी ओळखली जाते. यात 123.94cc सीसी इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याचे मायलेज सुमारे 48 किमी प्रति लिटर आहे. हायलाइट्समध्ये एलईडी लाइटिंग, 4.2-इंच टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अलॉय व्हील्स आणि सोनेरी रंगाचे यूएसडी फ्रंट फोर्क्स समाविष्ट आहेत. ही बाईक अशा रायडर्ससाठी आहे ज्यांना काहीतरी वेगळे आणि प्रीमियम हवे आहे.