
फोटो सौजन्य: Gemini
देशात इलेक्ट्रिक कार्सना जरी चांगली मागणी मिळत असली तरी देखील बरेच ग्राहक डिझेल कार खरेदी करत असतात. म्हणूनच आज आपण देशातील सर्वात स्वस्त डिझेल कार्सबद्दल जाणून घेऊयात.
या यादीत पहिलं नाव किआ सॉनेटचं आहे. माहितीनुसार, HTE (O) डिझेल व्हेरिएंटपासून या SUV मध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध होतो, ज्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 9.8 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.5-लिटर इंजिनसोबत 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स दिला आहे. हे इंजिन सुमारे 18.6 किमी/लिटर मायलेज देते. तसेच, बेस ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्येच इलेक्ट्रिक सनरूफ, 6 एअरबॅग्स, एलईडी लाइट्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमसारखे फीचर्स मिळतात.
या लिस्टमधील दुसरी कार टाटा नेक्सॉन आहे. Pure Plus डिझेल AMT व्हेरिएंटपासून ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची सुविधा मिळते आणि याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 10.55 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.5-लिटर 4-सिलेंडर इंजिन असून ते 6-स्पीड AMT गिअरबॉक्ससोबत येते. मायलेजच्या बाबतीतही ही कार दमदार आहे आणि सुमारे 24.08 किमी/लिटरपर्यंत चालते. यामध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस Android Auto/Apple CarPlay, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि विविध सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
डिझेल इंजिनसह चांगली ऑटोमॅटिक SUV हवी असल्यास महिंद्रा XUV 3XO हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. MX3 डिझेल व्हेरिएंटपासून ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध होतो, ज्याची किंमत सुमारे 10.85 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.5-लिटर 4-सिलेंडर इंजिन आणि 6-स्पीड AMT गिअरबॉक्स मिळतो. हे इंजिन 117hp पॉवर आणि 300Nm टॉर्क निर्माण करते. याचे मायलेज सुमारे 21.2 किमी/लिटर आहे. तसेच, या व्हेरिएंटमध्ये सनरूफ, वायरलेस चार्जिंग, क्रूझ कंट्रोल आणि 10.25-इंच टचस्क्रीनसारखे फीचर्स दिले आहेत.
या यादीत चौथं स्थान ह्युंदाई व्हेन्यूचं आहे. HX5 व्हेरिएंटपासून ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो आणि याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 11.8 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.5-लिटर CRDi टर्बो डिझेल इंजिन असून ते सुमारे 20.99 किमी/लिटर मायलेज देते. स्मूथ ड्रायव्हिंगसाठी 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. याशिवाय, पॅडल शिफ्टर्स, एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स, सनरूफ आणि क्रूझ कंट्रोलसारखे फीचर्स मिळतात.
टाटा कर्व ही कूप-स्टाईल SUV असून डिझेल इंजिनसह ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देणारा एक चांगला पर्याय आहे. Pure Plus डिझेल व्हेरिएंटपासून ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते, ज्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 13.8 लाख रुपयांपासून सुरू होते. यात ड्युअल क्लच ऑटोमॅटिक (DCA) गिअरबॉक्स दिला आहे, ज्यामुळे गिअर शिफ्टिंग खूपच स्मूथ होते. फीचर्समध्ये इल्युमिनेटेड स्टीयरिंग व्हील, फ्लश डोअर हँडल, टच-बेस्ड AC कंट्रोल आणि 6 एअरबॅग्स यांचा समावेश आहे.