टू-व्हीलर चालकांच्या मोबाइलमध्ये 'हे' 2 अॅप्स असलेच पाहिजे ! सुरक्षितता अजूनच वाढेल
भारतात दिवसेंदिवस दुचाकींच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे रस्त्यांवर वर्दळ वाढत आहे आणि यासोबतच अपघाताच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. हे अपघात टाळण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या खरबदाऱ्या पाळत असतात. त्यातीलच एक खबरदारी म्हणजे रायडींग करताना सेफ्टी किटचा वापर करणे. पण याव्यतिरिक्त रायडर्सच्या मोबाईल मध्ये काही महत्वाचे अॅप्स देखील असणे गरजेचे आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
आजच्या धावपळीच्या जीवनात बरेच लोक वेगाने गाड्या चालवत असतात. असे केल्याने, तुम्हाला दंड देखील बसू शकतो. शिवाय, असे करणे वाहतूक नियमांच्या विरुद्ध आहे. तसेच, देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये, वाहतूक पोलिस कॅमेऱ्यांचा वापर करून ओव्हरस्पीड चलान जारी करतात. अनेक वेळा वाहनाचा वेग निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असतो. अशा परिस्थितीत, वाहतूक पोलिस ऑनलाइन चलान जारी करतात, परंतु तंत्रज्ञानाच्या या युगात, यावरही उपाय मिळाला आहे.
सिंगल चार्जवर 501 KM ची रेंज ! ‘या’ पॉवरफुल Electric Bike ची डिलिव्हरी सुरु
भारतात दरवर्षी ओव्हर स्पीडमुळे अनेक रस्ते अपघात होतात. ज्यामुळे, हजारो लोकं आपले प्राण गमावतात. अशा अपघातांना रोखण्यासाठी, वाहतूक पोलिस अतिवेगावर लक्ष ठेवण्यासाठी आणि लोकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास भाग पाडण्यासाठी विविध उपाययोजना करतात. सिग्नल्सवर कॅमेरा लावणे हे त्यातीलच एक उपायोजना.
खरंतर, असे काही अॅप्स उपलब्ध आहेत, जे मोबाईलवर डाउनलोड केल्यानंतर तुम्ही चलान टाळू शकता. या अॅप्समध्ये इतर अनेक प्रकारच्या सुविधा देखील दिल्या जात आहेत. हे अॅप स्पीड कॅमेरा कुठे बसवला आहे याची 100 मीटर आधीच माहिती देते. चला या अॅप्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
हे अॅप iOS (आयफोन) वापरकर्त्यांसाठी अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. यामुळे स्पीड कॅमेरा नेव्हिगेशन नेव्हिगेट करणे सोपे होते. कंपनीचा दावा आहे की हे अॅप GPS द्वारे काम करते. स्पीड कॅमेरा येण्यापूर्वीच हे अॅप सूचना देण्यास सुरुवात करते. याव्यतिरिक्त, ते ट्रॅफिक लाइट्सवर बारकाईने लक्ष ठेवते.
हे अॅप रस्त्यावरील सरासरी स्पीडची माहिती देखील देते. कंपनीचा दावा आहे की हे अॅप कोणत्याही देशात वापरले जाऊ शकते. याचा अर्थ असा की हे अॅप परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठीही तितकेच चांगले काम करते.
95 KM ची रेंज ! Suzuki च्या ‘या’ पहिल्या वाहिल्या Electric Scooter चे भारतात प्रोडक्शन सुरु
Waze देखील मॅप आणि स्पीड कॅमेरा डिटेक्टर अॅप आहे. जे युजर्सला नोटिफिकेशन देऊन सतर्क करते. कंपनीचा दावा आहे की हे अँप रहदारी असलेल्या रस्त्यांची आणि बंद रस्त्यांची माहिती देखील देते. वाहनचालकांना रहदारी आणि मार्गाबाबत लेटेस्ट माहिती मिळत राहते. हे अॅप गुगल आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.