फोटो सौजन्य: iStock
दिवाळी सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या बाईक्सच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामागील कारण म्हणजे GST मध्ये झालेली घट. चला आपण 2 लाखांपेक्षा कमी किमतीच्या बेस्ट बाईक्सबद्दल जाणून घेऊयात
Hero Splendor Plus ही बाईक 73,902 ते 76,437 या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. ही भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय बाईक मानली जाते. कमी मेंटेनन्स कॉस्ट, सोपी राइडिंग आणि देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात उपलब्ध असलेले सर्व्हिस नेटवर्क यामुळे ती एक परफेक्ट कम्यूटर बाईक ठरते. जर तुम्ही पहिल्यांदाच बाईक घेणार असाल आणि टेंशन-फ्री राइड हवी असेल, तर Splendor Plus हा सर्वात उत्तम पर्याय आहे.
Royal Enfield बाईक खरेदी करणार आहात? कंपनीने 350cc Bikes मध्ये केला महत्वाचा बदल
TVS Raider 125 ची एक्स-शोरूम किंमत 80,500 ते 95,600 रुपये आहे. ही केवळ याच्या इंधन कार्यक्षमतेसाठीच नाही तर याचा मजेदार राईडसाठी देखील ओळखली जाते. या बाईकचे डिझाइन कॉलेजला जाणाऱ्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. यात डिस्क ब्रेक, सिंगल-चॅनेल ABS आणि डिजिटल TFT डिस्प्ले आहे. या बाईकचा मायलेज इंधन कार्यक्षमता 55 kmpl पेक्षा जास्त आहे.
ही बाईक 1.15 लाख ते 1.35 लाख रुपये या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. याचे इंजिन अतिशय स्मूद असून पॉवर डिलिव्हरीही अत्यंत लाईनियर आहे, ज्यामुळे ही बाईक शहरात तसेच हायवेवर उत्कृष्ट परफॉर्मन्स देते. 160cc सेगमेंटमध्ये ही एक ऑलराउंडर बाइक मानली जाते. याचे रायडिंग डायनामिक्स, कॉर्नरिंग आणि हँडलिंग दोन्ही बाबतीत ही आपल्या सेगमेंटमधील इतर बाईक्सपेक्षा सरस आहे.
डेअरिंग तर बघा! ग्राहकाने चक्क OLA शोरूमच्या समोरच जाळली कंपनीची स्कूटर, नेमकं कारण काय?
1.69 लाख ते 1.74 लाख रुपयांचा एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध असलेली Yamaha R15 V4 तिच्या एअरोडायनामिक डिझाइनमुळे, शार्प हेडलॅम्प्समुळे आणि अप्रतिम परफॉर्मन्समुळे आजही वेगळी ठरते. 150cc सेगमेंटमध्ये तिची बरोबरी करणारी दुसरी कोणतीही बाइक नाही.
1.81 लाख ते 2.15 लाख या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध असलेली Royal Enfield Classic 350 तिच्या जड बॉडी, दमदार आवाज आणि राजेशाही रायडिंग पोझिशनमुळे विशेष ठरते. नव्या Classic 350 मध्ये आता आणखी सुधारणा करण्यात आली असून, कमी व्हायब्रेशन, उत्कृष्ट थ्रॉटल रिस्पॉन्स आणि स्मूद इंजिन यामुळे ती लॉन्ग राईडसाठी परफेक्ट बाईक ठरते.