फोटो सौजन्य: @vizhpuneet/X.com
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हलके वजन, कमी देखभाल खर्च आणि वापरण्यास सुलभ तंत्रज्ञान यामुळे अनेक ग्राहक पेट्रोल स्कूटरऐवजी ई-स्कूटरकडे वळत आहेत. शहरांमधील ट्रॅफिक आणि इंधनाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक स्कूटर अधिक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरत आहेत.
बाजारात Ather, TVS, Bajaj आणि Hero यांसारख्या कंपन्यांचे ई-स्कूटर उपलब्ध असले तरी सर्वाधिक लोकप्रियता Ola Electric च्या स्कूटरला मिळत आहे. अत्याधुनिक फीचर्स, दमदार बॅटरी रेंज आणि स्टायलिश डिझाइनमुळे Ola Electric आज भारतीय ईव्ही बाजारपेठेत अग्रस्थानी पोहोचली आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या स्कूटरमध्ये मागील काही वर्षांपासून खराबी दिसत आहे. त्यातही स्कूटर बिघडल्यानंतर सर्व्हिसिंग सेंटरकडून कोणतीही दुरुस्ती न मिळायचा काही ग्राहक आरोप करत आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातून आता अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पालनपूर परिसरात एका तरुणाने आपला राग व्यक्त करण्यासाठी शोरूमसमोर स्वतःची स्कूटर पेटवून दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
Gujarat: Man Sets Ola Scooter On Fire Outside Showroom, Alleges Company Staff Ignored His Complaint.@bhash frustration of your customer shows what crap your are selling. pic.twitter.com/KJSFC2JrfR — VIZHPUNEET (@vizhpuneet) October 9, 2025
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या तरुणाने नुकतीच ओला स्कूटर खरेदी केली होती. मात्र, काही दिवसांतच स्कूटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्याच्या म्हणण्यानुसार स्कूटर चालवताना स्टीअरिंग व्हील आणि टायरचे कनेक्शन तुटले, ज्यामुळे तो पडता पडता वाचला. यांनतर त्या तरुणाने शोरूमकडे अनेक वेळा तक्रार केली आणि दुरुस्तीची विनंती केली, परंतु शोरूमने कोणतीही कारवाई केली नाही.
अनेक दिवस निराशा आणि समस्यांना तोंड दिल्यानंतर, गुरुवारी त्या तरुणाने रागाच्या भरात शोरूमबाहेर त्याच्या स्कूटरला चक्क आग लावली. स्कूटर क्षणार्धात पेटून उठली. हे दृश्य पाहून जवळचे लोक आश्चर्यचकित झाले आणि कोणीतरी व्हिडिओ रेकॉर्ड केला. स्थानिकांनी सांगितले की, या तरुणाचा कोणालाही इजा करण्याचा कोणताही हेतू नव्हता, त्याला फक्त आपला राग व्यक्त करायचा होता.
‘या’ बाईकसाठी ग्राहक झाले खुळे! चक्क 14 दिवसात जगभरातील युनिट्स Sold Out, कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कमाई
गेल्या काही वर्षांत ओला कंपनीला असंख्य तक्रारी आल्या आहेत. वाहन बिघाड झाल्यानंतर सेवा केंद्राने दुरुस्ती करण्यात दुर्लक्ष केल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. काही प्रकरणांमध्ये, ग्राहकांनी रागाच्या भरात त्यांच्या वाहनांना आग लावली आहे.