फोटो सौजन्य: iStock
भारतात सतत वाढणाऱ्या डिझेल-पेट्रोलच्या किमतीत आता लोकांना आता अशी स्कूटर हवी आहे जी किफायतशीर, पर्यावरणासाठी चांगली आणि स्टायलिश देखील दिसते. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रिक स्कूटर लोकांचे लक्ष वेधत आहे. विशेषतः ऑफिसमध्ये ये-जा करणाऱ्या रायडर्ससाठी, इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्त आणि स्मार्ट ऑप्शन ठरत आहेत.
मार्केटमध्ये Bajaj Chetak, TVS iQube आणि Ather 450X सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी मिळत आहे. हे स्कूटर केवळ स्वस्त नाहीत तर मेट्रोने प्रवास करण्यापेक्षा कमी खर्चिक देखील आहेत. भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी पाहून, या कंपन्यांनी आकर्षक फीचर्ससह आणि उत्कृष्ट रेंजसह त्यांचे लोकप्रिय मॉडेल सादर केले आहेत. चला या स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
बजाज चेतक ही एक रेट्रो-लुकिंग इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी तिच्या मजबूत बिल्ड क्वालिटी आणि प्रीमियम डिझाइनसाठी ओळखली जाते. Bajaj Chetak 2903, 3502 आणि 3503 या तीन व्हेरियंटची किंमत 98,498 रुपये, 1.22 लाख रुपये आणि 1.02 लाख रुपये आहे. 2903 व्हेरियंटला 2.9 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह 123 किमीची रेंज मिळते, तर 3501/3502 व्हेरियंटला 3.5 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह 153 किमीची रेंज मिळते असा दावा आहे.
TVS Apache RTR 200 4V मार्केटमध्ये लाँच, सुरवातीची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी
या स्कूटरमध्ये टचस्क्रीन टीएफटी डिस्प्ले, म्युझिक आणि कॉल नोटिफिकेशन्स, रिव्हर्स मोड, जिओ-फेन्सिंग आणि 35 लिटर अंडरसीट स्टोरेज सारखे स्मार्ट फीचर्स आहेत.
टीव्हीएस आयक्यूब ही मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. याची सुरुवातीची किंमत 1.09 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 1.60 लाख रुपयांपर्यंत जाते. ही स्कूटर आयक्यूब, आयक्यूब एस आणि आयक्यूब एसटी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यांची रेंज – 94 किमी, 145 किमी आणि 212 किमी आहे. टीव्हीएस आयक्यूबमध्ये 7-इंच टीएफटी टचस्क्रीन, जॉयस्टिक नेव्हिगेशन, रिव्हर्स मोड, यूएसबी चार्जिंग, एलईडी लाइटिंग आणि जिओ-फेन्सिंग सारखे फीचर्स आहेत, ज्यामुळे ती लांब पल्ल्याच्या दैनंदिन वापरासाठी एक उत्तम पर्याय बनते.
एथर 450एक्स ही एक हाय-टेक आणि युथ रायडर्स-ओरिएंटेड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याचे दोन व्हेरियंट- 2.9 kWh आणि 3.7 kWh ची किंमत अंदाजे 1.49 लाख आणि 1.59 लाख रुपये आहे. ही स्कूटर 126 किमी आणि 161 किमीच्या रेंजसह येते. यात 7-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, गुगल मॅप्स इंटिग्रेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पार्क असिस्ट आणि ओटीए अपडेट्स सारखे प्रगत फीचर्स आहेत.