TVS Apache RTR 200 4V मार्केटमध्ये लाँच,
टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या लोकप्रिय अपाचे सिरीजमधील नवीन मॉडेल, 2025 टीव्हीएस अपाचे आरटीआर 200 4व्ही भारतात सादर केली आहे. ही बाईक प्रगत तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण डिझाइन आणि रेसिंग इन्स्पायर्ड परफॉर्मन्स यांचा सुरेख मिलाफ यात पाहायला मिळतो. विशेष म्हणजे ही बाईक OBD2B (On-Board Diagnostics 2nd Generation – B) उत्सर्जन मानकांशी सुसंगत असून ती भविष्यातील पर्यावरणीय नियमांची पूर्तता करते.
या नव्या अपाचेमध्ये 37 मिमी अपसाईड डाऊन (USD) फ्रंट सस्पेन्शन देण्यात आले आहे, ज्यामुळे तीव्र वळणांवर उत्कृष्ट स्टेबिलिटी आणि कंट्रोल मिळते. यासोबत हायड्रोफॉर्म्ड हँडलबार दिल्यामुळे बाईक सर्वप्रकारच्या रस्त्यांवर उत्तम हँडलिंगसाठी सज्ज आहे. रेड अलॉय व्हील्स, आकर्षक ग्राफिक्स आणि प्रीमियम डिझाइनमुळे ही बाईक इतर बाईक्सच्या तुलनेत उठून दिसते. ही बाईक ग्लॉसी ब्लॅक, मॅट ब्लॅक आणि ग्रॅनाइट ग्रे या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Hero Vida VX2 चा नवा कोरा टिझर जारी, ‘या’ दिवशी होणार लाँच
परफॉर्मन्सच्या बाबतीत, 2025 अपाचे आरटीआर 200 4व्ही 9000 RPM वर 20.8 PS शक्ती आणि 7250 RPM वर 17.25 Nm टॉर्क निर्माण करते. राईडिंग अनुभव अधिक सुरक्षित आणि वैविध्यपूर्ण करण्यासाठी ड्युअल चॅनल ABS, Urban, Sport आणि Rain हे तीन राईड मोड्स, स्लिपर क्लच, अॅडजस्टेबल ब्रेक व क्लच लिव्हर्स, Bluetooth कनेक्टिव्हिटी, व्हॉइस असिस्ट, टीव्हीएस SmartXonnect सिस्टम, तसेच फुल्ल डिजिटल डिस्प्ले, एलईडी हेडलॅम्प आणि डीआरएल्स यांचा समावेश करण्यात आला आहे.
2016 मध्ये अपाचे आरटीआर 200 4व्ही पहिल्यांदाच सादर झाली होती. तेव्हा याचे डिझाइन, राईडिंग डायनॅमिक्स आणि रेसिंग परंपरेचा प्रभाव दाखवला होता. कालांतराने या बाईकमध्ये काही खास फीचर्स देण्यात आले आहे. जसे की राईड मोड्स, ड्युअल ABS सोबत रिअर लिफ्ट-ऑफ प्रोटेक्शन, आणि रेस-ट्यून स्लिपर क्लच.
या अपग्रेडबाबत टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रिमियम बिझनेस प्रमुख विमल सुम्बळी म्हणाले, “टीव्हीएस अपाचे हा एक ब्रँड नसून 60 लाखांहून अधिक रायडर्सना प्रेरणा देणारी जागतिक चळवळ आहे. 2025 चे नवीन अपाचे आरटीआर 200 4व्ही ही रेसिंगचा थरार आणि आधुनिक इंजिनिअरिंग एकत्र आणणारी बाईक आहे.
ही बाईकी सध्या टीव्हीएसच्या अधिकृत डीलरशिप्सवर उपलब्ध आहे आणि तिची इंट्रोडक्टरी किंमत 1,53,990 (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे.