फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारची मागणी जरी जोर धरत असली तरी अनेक जण आजही इंधनावर चालणाऱ्या कारला प्राधान्य देत आहे. यातही वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे कित्येक मध्यम वर्गीय लोकं, उत्तम मायलेज देणारी कारच्या शोधात असतात. जर तुम्ही सुद्धा 10 -12 लाखाच्या बजेटमध्ये उत्तम कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
आज आपण देशातील तीन उत्तम मायलेज देणाऱ्या कार्सबद्दल जाणून घेणार आहोत. मायलेजसोबतच आपण या कारच्या सेफ्टीबद्दल देखील जाणून घेणार आहोत.
मालक असावा तर असा ! कामगारांनी टार्गेट पूर्ण केल्यामुळे मालकाने प्रत्येकाला दिली SUV कार
मारुती सुझुकी स्विफ्ट ही देशांतर्गत बाजारपेठेत एक लोकप्रिय हॅचबॅक आहे. या कारच्या पेट्रोल + सीएनजी व्हीएक्सआय मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 8.20 लाख रुपये आहे. स्विफ्टमध्ये 1.2-लिटर झेड-सिरीज पेट्रोल इंजिन आहे, ज्यामध्ये 5-स्पीड एमटी आणि 5-स्पीड एएमटीसह ट्रान्समिशन पर्याय देखील आहेत. परंतु, या कारमध्ये सीएनजीसह फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन दिले जाते.
या कारचे पेट्रोल मॉडेल 25 किमी/लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे आणि सीएनजी मॉडेल 33 किमी/किलोग्राम मायलेज देण्यास सक्षम आहे. यात 37 लिटर पेट्रोल टाकी आणि 60 लिटर सीएनजी टाकी आहे. जर तुम्ही दोन्ही टाक्या भरल्या तर 1000 किमी पर्यंत प्रवास तुम्ही सहज पार करू शकता.
मारुतीच्या डिझायरला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. पेट्रोल + सीएनजीसह येणाऱ्या या सेडानच्या VXI मॉडेलची किंमत 8.79 लाख रुपये आहे. यात 5 -स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह झेड-सिरीज 1.2-लिटर नवीन 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. मारुती डिझायर पेट्रोल मॉडेलचे मायलेज 25 किमी/लीटर आहे, तर सीएनजी मॉडेलचे मायलेज 33.73 किमी/किलो आहे. यात 37 लिटर पेट्रोल टँक आणि 60 लिटर सीएनजी टँक देखील आहे, ज्याची एकूण रेंज 1000 किमी पेक्षा जास्त आहे.
या सेडानमध्ये 6 एअरबॅग्ज, ESP, EBD सह ABS, हिल होल्ड असिस्ट, ब्रेक असिस्ट, सर्व सीटसाठी 3-पॉइंट सीट बेल्ट आणि ISOFIX माउंट्स अशी सेफ्टी फीचर्स आहेत. याशिवाय, 9-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, सिंगल पेन सनरूफ, क्रूझ कंट्रोल, कप होल्डर्ससह रिअर सेंटर आर्मरेस्ट, वायरलेस चार्जर,आणि 360-डिग्री सराउंड कॅमेरा यांसारखी फीचर्स देखील उपलब्ध आहेत.
देशातील बेस्ट कार्सबद्दल बोलले जात आहे आणि यात टाटाच्या कारचा समावेश नाही, असे होणार नाही. आज आपण टाटा पंचबद्दल जाणून घेऊया. पेट्रोल + सीएनजी पंच प्युअर व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 7.30 लाख रुपये आहे. यात 1.2-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. टाटा पंच पेट्रोल इंधनासह 20 किमी/लीटर आणि सीएनजीसह 27 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे. टाटा पंचला 37-लिटर पेट्रोल टँक आणि 30-30 लिटरच्या दोन सीएनजी टँक मिळतात. जर तुम्ही या कारच्या पेट्रोल आणि सीएनजीच्या दोन्ही टाक्या भरल्या तर ही एसयूव्ही सुमारे 950 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापू शकते.