(फोटो सौजन्य-AI एआय)
649cc इंजिन आणि 67.3 bhp पॉवर
2027 कावासाकी Z650RS मध्ये 649cc लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,000rpm वर 67.3bhp पॉवर आणि 6,700rpm वर 64Nm टॉर्क तयार करते. मागच्या मॉडेलच्या तुलनेत टॉर्कमध्ये 1.9Nm वाढ झाली आहे. इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. दोन्ही बाजूंना 17-इंच चाकांचा वापर करण्यात आला आहे.
अॅस्टन मार्टिनची पहिली स्ट्रीट बाईक पाहिली का? 130 bhp पॉवरसह दमदार लूक!
राइडिंग आणि हार्डवेअर
बाइकमध्ये हाय-टेन्साइल स्टीलचा ट्युब्युलर डायमंड फ्रेम देण्यात आला आहे. पुढे 41mm टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे Horizontal Back-link सस्पेन्शन मिळते. फ्रंटला 120/70 आणि रिअरला 160/60 सेक्शनचे टायर्स आहेत. 1,405mm व्हीलबेस, 800mm सीट हाइट आणि 125mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. बाइकचे वजन 179kg असून फ्युल टँकमध्ये 12 लिटर पेट्रोल भरता येते.
सेफ्टी आणि टेक फीचर्स
ब्रेकिंगसाठी पुढे ड्युअल 300mm डिस्क आणि मागे 220mm डिस्क देण्यात आली आहे. Kawasaki Traction Control System आणि ABS हे सेफ्टी फीचर्स स्टँडर्ड आहेत. याशिवाय Assist & Slipper Clutch, Economical Riding Indicator, स्पोक-स्टाइल कास्ट व्हील्स आणि राउंड LED हेडलॅम्प मिळतो.
Triumph Scrambler 400 X पावर, पर्फोर्मंस आणि इंजिनाची A टू Z माहिती! जाणून घ्या
निओ-रेट्रो डिझाइन कायम
गोल LED हेडलॅम्प, ड्युअल-पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि फ्लॅट रिअर प्रोफाइलमुळे Z650RS ला खास निओ-रेट्रो ओळख मिळते. आरामदायी राइडिंगसाठी रुंद आणि फ्लॅट हँडलबार देण्यात आला आहे. भारतीय मार्केटमध्ये या बाइकची स्पर्धा रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650 आणि ट्रायम्फ ट्रायडेंट 660 सारख्या मोटरसायकलींशी होते.






