BMW F 450 GS Sport Bike Launch With Price Rs 5.90 Lakh In India (फोटो सौजन्य-AI एआय)
BMW मोटोराडने BMW F 450 GS Sport ही नवीन टॉप व्हेरिएंट अॅडव्हेंचर मोटरसायकल भारतात लाँच केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत ₹5.90 लाख ठेवण्यात आली आहे. नवीन Sport व्हेरिएंटमध्ये Racing Red रंगासह Sport सस्पेंशन, Gear Shift Assistant Pro आणि Riding Modes Pro ही फीचर्स स्टँडर्ड मिळतात. यामुळे F 450 GS च्या लाइनअपमध्ये Sport व्हेरिएंट सर्वात वरच्या प्लेसवर पोहोचले आहे. कंपनीने या बाईकसाठी ₹9,999 प्रति महिना EMI चा पर्यायही दिला आहे.
BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
Racing Red रंग आणि अॅडव्हेंचर डिझाइन
BMW F 450 GS Sport मध्ये खास Racing Red रंग दिला आहे. त्यासोबत Rallye विंडस्क्रीन, ब्लॅक हँड प्रोटेक्टर्स, ऑफ-रोड फुटरेस्ट्स आणि प्लास्टिक इंजिन गार्ड मिळतो. बाईकचा GS डिझाइन कायम ठेवण्यात आला असून X आकाराचा फुल LED हेडलॅम्प, फ्रंट बीक, स्प्लिट सीट, टेपर अॅल्युमिनियम हँडलबार आणि बॉडी-कलर साइड पॅनल्स तिच्या अॅडव्हेंचर लूकमध्ये भर घालतात.
राइडिंग मोड्स आणि सेफ्टी फीचर्स
F 450 GS मध्ये Rain, Road, Enduro आणि Enduro Pro असे 4 राइडिंग मोड्स आहेत. ABS Pro, Dynamic Brake Control, Dynamic Traction Control आणि Engine Drag Torque Control यांसारखी सेफ्टी फीचर्स मिळतात. 6.5-इंच TFT डिस्प्लेवर Pure Ride Screen आणि Sport Screen पाहता येतात. मल्टीकंट्रोलरच्या मदतीने रायडर विविध सेटिंग्ज सहज हाताळू शकतो. Sport व्हेरिएंटमधील Gear Shift Assistant Pro गिअर बदलताना क्लचचा वापर कमी करण्यास मदत करतो.
BMW ची 603 HP बुलेटप्रूफ लक्झरी कार! 9mm गोळ्यांपासून संरक्षण, प्लग-इन हायब्रिड इंजिनचा दम
420cc इंजिन आणि किंमत
BMW F 450 GS मध्ये 420cc ट्विन-सिलिंडर इनलाइन इंजिन दिले आहे. हे इंजिन 8,750 rpm वर 47 bhp पॉवर आणि 6,750 rpm वर 43 Nm टॉर्क देते. इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. बाईकमध्ये 14 लिटर फ्युल टँक, 845 mm सीट उंची, पुढे 19-इंच आणि मागे 17-इंच अॅल्युमिनियम व्हील्स मिळतात.
Base, Exclusive आणि Trophy व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे ₹4.95 लाख, ₹5.15 लाख आणि ₹5.60 लाख आहे. Sport व्हेरिएंटची प्रोडक्शन होसूर, तमिळनाडू येथील TVS कारखान्यात होते. स्टँडर्ड वॉरंटी 3 वर्षांची असून ती चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी वाढवण्याचा ऑप्शन आहे.






