
फोटो सौजन्य: Pinterest
Renault Duster ची प्री-बुकिंग 26 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना इंट्रोडक्टरी किंमत आणि प्रायॉरिटी डिलिव्हरीचा लाभ मिळणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, नॉन-हायब्रिड व्हेरिएंटची डिलिव्हरी मार्च 2026 पासून सुरू होईल, तर हायब्रिड व्हेरिएंटची डिलिव्हरी दिवाळी 2026 च्या आसपास अपेक्षित आहे. ग्राहक फक्त 21,000 रुपये भरून या SUV ची प्री-बुकिंग करू शकतात.
Maruti Grand Vitara vs Toyota Hyryder: मध्यम वर्गीय व्यक्तीसाठी कोणती SUV एकदम परफेक्ट?
नव्या Duster मध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. पहिला Turbo TCe 160 पेट्रोल इंजिन असून तो 163 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करतो. यासोबत 6-स्पीड DCT गिअरबॉक्स दिला आहे.
दुसरा पर्याय 1.8-लीटर E-Tech 160 स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिनचा असून, यात 1.4 kWh बॅटरी आणि 8-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही SUV शहरातील वापरात 80 टक्के वेळ इलेक्ट्रिक मोडमध्ये चालू शकते.
तिसरा पर्याय TCe 100 पेट्रोल इंजिनचा असून तो 100 PS पॉवर देतो. या SUV चा ग्राउंड क्लीयरन्स 212 मिमी आहे.
मायलेजच्या बाबतीत ‘ही’ बाईक एकदम खतरनाक! फुल टॅंकवर चालते 800 किमी आणि किंमत 1 लाखांपेक्षा कमी
नवी Duster आपला जुना बॉक्सी डिझाइन कायम ठेवते, मात्र आता त्यात नवीन हेडलॅम्प्स, कनेक्टेड LED टेललॅम्प्स आणि अधिक मजबूत बंपर यांसारखे आधुनिक घटक जोडण्यात आले आहेत. कंपनी 7 वर्षांची वॉरंटी देखील देत आहे.
केबिनच्या बाबतीत, Duster पूर्वीप्रमाणेच मजबूत आणि प्रीमियम फील देते, मात्र आता अधिक अॅडव्हान्स फीचर्ससह सुसज्ज करण्यात आली आहे. SUV मध्ये 10.2 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे.