
फोटो सौजन्य: Pinterest
सध्या TVS Star City Plus ही भारतातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक असलेली बाईक मानली जात आहे. याची एक्स-शोरूम किंमत साधारण 75,200 रुपये आहे, जी सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सहज बसते. ऑफिसला जाण्यासाठी किंवा दैनंदिन कामांसाठी ही बाईक एक उत्तम पर्याय ठरते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Mahindra BE6 ला कशामुळे लागली आग? अखेर कंपनीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण
या बाईकमध्ये 109.7cc चे एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे BS6 नियमांनुसार तयार केले आहे. हे इंजिन चांगली पॉवर जनरेट करते आणि शहराच्या रस्त्यांवर अतिशय स्मूद चालते. 4-स्पीड गिअरबॉक्समुळे नवीन रायडर्ससाठी देखील ही बाईक चालवणे सोपे होते. याची टॉप स्पीड साधारण 90 किलोमीटर प्रति तास आहे, जी रोजच्या वापरासाठी पुरेशी आहे.
TVS Star City Plus चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे मायलेज. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक जवळपास 83 kmpl चे मायलेज देते. प्रत्यक्ष रस्त्यावरही ही बाईक 70 ते 75 kmpl पर्यंतचे मायलेज आरामात देते. यामध्ये 10 लीटरची इंधन टाकी (Fuel Tank) मिळते, ज्यामुळे एकदा टाकी पूर्ण भरल्यावर ही बाईक साधारण 800 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
बाईकच्या टॉप मॉडेलमध्ये पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक दिला आहे, जो बाईकवर चांगले नियंत्रण मिळवून देतो. तसेच यामध्ये सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग सिस्टीम मिळते, ज्यामुळे अचानक ब्रेक लावताना सुरक्षितता वाढते. यासोबतच LED हेडलाईट, डिजिटल आणि अॅनालॉग मीटर तसेच आरामदायी सीट यामुळे प्रवासाचा आनंद वाढतो.
जर तुमचे बजेट 80,000 रुपयांच्या आसपास असेल आणि तुम्हाला कमी खर्चात जास्त मायलेज देणारी बाईक हवी असेल, तर TVS Star City Plus एक उत्तम निवड आहे. ही बाईक बाजारात Hero Splendor Plus आणि Honda Shine सारख्या बाईक्सला तगडी स्पर्धा देते.