
फोटो सौजन्य: Pinterest
किंमतीच्या दृष्टीने पाहता Maruti Grand Vitara ही मध्यमवर्गीयांसाठी थोडी अधिक परवडणारी ठरते. तिची एक्स-शोरूम किंमत 10.77 लाख रुपये पासून सुरू होते, तर Toyota Hyryder ची सुरुवातीची किंमत 10.95 लाख रुपये आहे. हायब्रिड टॉप व्हेरिएंटमध्येही ग्रँड विटारा किंचित स्वस्त आहे. याची ऑन-रोड किंमत सुमारे 22.74 लाख रुपये, तर हायरीडरच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 22.79 लाख रुपये आहे.
दोन्ही SUVs मध्ये 1.5-लीटर स्ट्रॉन्ग हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 91.18 bhp पॉवर आणि 122 Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही गाड्यांमध्ये e-CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. ARAI नुसार दोन्हींचे मायलेज 27.97 kmpl आहे, जे हायब्रिड सेगमेंटमध्ये उत्कृष्ट मानले जाते. प्रत्यक्ष वापरात Hyryder थोडे अधिक मायलेज देत असल्याचे सांगितले जाते, तर Grand Vitara किंचित कमी. मात्र इंधन बचतीच्या बाबतीत दोन्ही कार्स मध्यमवर्गीयांसाठी उत्तम पर्याय आहेत.
दोन्ही SUVs मध्ये 9-इंच टचस्क्रीन, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखे फीचर्स मिळतात. मात्र Grand Vitara मध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, OTA अपडेट्स, व्हॉइस कमांड आणि रिअल-टाइम व्हेईकल ट्रॅकिंग यांसारखी अतिरिक्त फीचर्स देण्यात आली आहेत.
दुसरीकडे Hyryder मध्ये पॅडल शिफ्टर्स आणि एअर क्वालिटी कंट्रोलसारखी वैशिष्ट्ये आहेत. सेफ्टीसाठी दोन्ही SUVs मध्ये 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ESC आणि TPMS दिले आहेत. Grand Vitara मध्ये SOS इमर्जन्सी असिस्ट आणि हिल असिस्ट यांसारखी अॅडव्हान्स फीचर्स असल्यामुळे ती थोडी आघाडीवर ठरते.
कमी किंमत, अधिक फीचर्स आणि सोपे मेंटेनन्स महत्त्वाचे असतील, तर Maruti Grand Vitara ही कर मध्यमवर्गासाठी अधिक व्हॅल्यू फॉर मनी पर्याय ठरते. मात्र ब्रँड व्हॅल्यू, चांगली रिसेल आणि दीर्घकालीन विश्वास हवा असेल, तर Toyota Hyryder हाही एक मजबूत पर्याय आहे.