Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारुती सुझुकीचा धमाका;  नव्या लूक आणि ६-स्पीड गिअरबॉक्ससह ‘ब्रेझा फेसलिफ्ट’ २३ जुलैला होणार लाँच!

मारुती सुझुकी २३ जुलै २०२६ रोजी आपल्या लोकप्रिय ब्रेझा एसयूव्हीचे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन प्रगत वैशिष्ट्ये आणि नवीन ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 30, 2026 | 09:13 PM
मारुती सुझुकीचा धमाका;  नव्या लूक आणि ६-स्पीड गिअरबॉक्ससह ‘ब्रेझा फेसलिफ्ट’ २३ जुलैला होणार लाँच!
Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘मारुती सुझुकी’ आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीपैकी एक असलेल्या ‘ब्रेझा’चे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन देशांतर्गत बाजारपेठेत उतरवण्यासाठी सज्ज झाली आहे. २३ जुलै २०२६ रोजी ही कार अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे. भारतीय बाजारपेठेत आल्यापासून ब्रेझाने आतापर्यंत १४ लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास जिंकला असून, टाटा नेक्सॉन आणि ह्युंदाई व्हेन्यू यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी हा नवीन अपडेटेड अवतार बाजारात आणला जात आहे.

इंजिन आणि नवीन ६-स्पीड ट्रान्समिशन

या नवीन मॉडेलमध्ये सर्वात मोठा यांत्रिक बदल ट्रान्समिशनमध्ये पाहायला मिळेल. सध्याच्या ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सऐव्हेजी आता ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे हायवेवर गाडी चालवताना इंजिनचा वेग संतुलित राहील आणि ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुधारेल. गाडीमध्ये सध्याचेच १.५-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन कायम ठेवले जाईल, जे १०२ पॉवर आणि १३७ टॉर्क जनरेट करते.

मारुती सुझुकीच्या या आहेत 5 ऐतिहासिक कार! आत्ताच जाणून घ्या

सीएनजी मॉडेलमध्ये मोठा बदल

मारुती सुझुकी या कारच्या फॅक्टरी-फिटेड सीएनजी व्हर्जनमध्ये एक मोठा आणि सोयीस्कर बदल करणार आहे. सध्या सीएनजी सिलेंडर बूट स्पेसमध्ये (डिकी) असतो, ज्यामुळे सामान ठेवण्यास जागा उरत नाही. परंतु, नवीन ब्रेझामध्ये हा सीएनजी टँक थेट गाडीच्या खालच्या भागात बसवला जाईल. यामुळे ग्राहकांना डिकीमध्ये मोठी आणि व्यावहारिक जागा मिळणार आहे. सीएनजी मोडमध्ये हे इंजिन ८७ पॉवर आणि १२१.५ टॉर्क प्रदान करेल.

मारुती सुझुकीची नवी 7-सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही येणार मार्केटमध्ये; दमदार रेंज, प्रीमियम फीचर्स आणि SUV-सारखा लूक!

हाय-टेक इंटीरियर आणि वैशिष्ट्ये

नवीन ब्रेझाचे इंटीरियर पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक असेल. यात सध्याच्या ९-इंच स्क्रीनऐवजी नवीन १०.२५-इंचची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम पाहायला मिळेल, ज्याचे ग्राफिक्स आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स अधिक प्रगत असतील. याशिवाय हेड्स-अप डिस्प्ले, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट, फ्लॅट-बॉटम स्टिअरिंग व्हील, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि ३६०-डिग्री कॅमेरा यांसारखे प्रीमियम फीचर्स यामध्ये कायम राहतील.

बाहेरून विचार केला तर, गाडीच्या मूळ आकारात बदल न करता केवळ नवीन डिझाईनचे अलॉय व्हील्स, अपडेटेड बॉडी क्लॅडिंग आणि हेडलाईट्स-टेललाईट्समध्ये किरकोळ बदल केले जातील. सध्याच्या मॉडेलची किंमत ८.४ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते, तर नवीन फेसलिफ्ट मॉडेलसाठी ग्राहकांना थोडी अधिक किंमत मोजावी लागू शकते.

 

Web Title: Breeza facelift to launch on 23rd july auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Mahindra News: महिंद्राची मोठी तयारी! येत्या काही महिन्यांत लॉन्च होणार ३ नवीन दमदार एसयूव्ही
1

Mahindra News: महिंद्राची मोठी तयारी! येत्या काही महिन्यांत लॉन्च होणार ३ नवीन दमदार एसयूव्ही

‘सीडी १००’ दुचाकीचे हे फीचर्स ज्यामुळे ती बनली ८०-९० च्या दशकातील सर्वात फेमस बाईक? जाणून घ्या
2

‘सीडी १००’ दुचाकीचे हे फीचर्स ज्यामुळे ती बनली ८०-९० च्या दशकातील सर्वात फेमस बाईक? जाणून घ्या

सेकंड हँड वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय कसा सुरू करावा? महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या
3

सेकंड हँड वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय कसा सुरू करावा? महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या

पेट्रोल पंपावर ‘झिरो’ बघायला का सांगतात? ग्राहक आणि इंजिनच्या सुरक्षेचे रहस्य; जाणून घ्या एका क्लिकवर
4

पेट्रोल पंपावर ‘झिरो’ बघायला का सांगतात? ग्राहक आणि इंजिनच्या सुरक्षेचे रहस्य; जाणून घ्या एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.