Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra News: महिंद्राची मोठी तयारी! येत्या काही महिन्यांत लॉन्च होणार ३ नवीन दमदार एसयूव्ही

महिंद्रा कंपनी आगामी ९ महिन्यांत स्कॉर्पिओ-एन फेसलिफ्ट, नवीन थार आणि व्हिजन.एस संकल्पनेवर आधारित कॉम्पॅक्ट मोनोकोक अशा तीन शक्तिशाली पेट्रोल-डिझेल एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 30, 2026 | 08:50 PM
Mahindra News: महिंद्राची मोठी तयारी! येत्या काही महिन्यांत लॉन्च होणार ३ नवीन दमदार एसयूव्ही
Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘महींद्रा’ लवकरच देशांतर्गत बाजारपेठेत आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या काही काळापासून इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिल्यानंतर, कंपनी आता पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी ९ महिन्यांत महिंद्रा तीन नवीन एसयूव्ही लॉन्च करणार आहे, ज्यामध्ये दोन ‘बॉडी-ऑन-फ्रेम’ आणि एका ‘मोनोकोक’ एसयूव्हीचा समावेश असेल.

१. महिंद्रा स्कॉर्पिओ-एन फेसलिफ्ट (Mahindra Scorpio-N Facelift)

या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत महिंद्रा आपली अत्यंत लोकप्रिय एसयूव्ही ‘स्कॉर्पिओ-एन’चे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात आणू शकते. जून २०२२ मध्ये लाँच झालेल्या या गाडीला आता एका फ्रेश लूकची गरज आहे. टेस्टिंगदरम्यान समोर आलेल्या फोटोंनुसार, नवीन स्कॉर्पिओ-एनमध्ये सुधारित बंपर, नवीन डिझाईनचे हेडलाईट्स आणि टेललाईट्स, १८-इंचचे नवीन अलॉय व्हील्स आणि आकर्षक रेडिएटर ग्रिल पाहायला मिळेल.

भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या ५ ‘लेजंडरी’ महिंद्रा कार! एका क्लिकवर पाहून घ्या

गाडीच्या इंटीरियरमध्येही मोठे बदल अपेक्षीत आहेत. यात डॅशबोर्डची पुनर्रचना करून हॉरिझॉन्टल एसी व्हेंट्स, १०.२५-इंचचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि १०.२५-इंचची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाईल. इंजिन आणि ट्रान्समिशन पर्याय सध्याच्या मॉडेलसारखेच राहतील.

२. महिंद्रा थार फेसलिफ्ट (Mahindra Thar Facelift)

स्कॉर्पिओ-एननंतर महिंद्राची प्रसिद्ध ऑफ-रोडर ‘थार’ देखील नवीन अवतारात सादर केली जाईल. या फेसलिफ्ट मॉडेलची बऱ्याच दिवसांपासून रस्त्यांवर चाचणी सुरू आहे. नव्या थारचा लूक ‘थार रॉक्स’ (Thar Roxx) सारखा असण्याची शक्यता आहे. यामध्ये ६-डबल-स्लॉट रेडिएटर ग्रिल, सी-शेप्ड डीआरएलसह एलईडी हेडलाईट्स आणि १९-इंचचे अलॉय व्हील्स दिले जातील. तसेच इलेक्ट्रिकली फोल्डिंग ओआरव्हीएम, पॅसिव्ह की-लेस एंट्री आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखे प्रीमियम फीचर्स यामध्ये जोडले जातील. इंजिनमध्ये कोणताही यांत्रिक बदल केला जाणार नाही.

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे

३. महिंद्रा व्हिजन.एस (Mahindra Vision.S – Production Version)

२०२७ च्या पहिल्या तिमाहीत महिंद्रा आपल्या ‘व्हिजन.एस’ संकल्पनेवर आधारित नवीन कॉम्पॅक्ट मोनोकोक एसयूव्ही लाँच करू शकते. ही गाडी ‘XUV 3XO’ आणि ‘थार’च्या दरम्यानच्या सेगमेंटमध्ये स्थान मिळवेल. ‘NU_IQ’ प्लॅटफॉर्मवर आधारित या गाडीला एक मस्कुलर आणि स्क्वेअरिश लूक दिला जाईल. यात १.२-लीटर पेट्रोल आणि १.५-लीटर डिझेल इंजिनचे पर्याय मिळतील, तर भविष्यात याचे हायब्रिड व्हर्जनही येण्याची शक्यता आहे.

महिंद्राचे हे तिन्ही मॉडेल्स आगामी काळात भारतीय ऑटो बाजारपेठेत मोठी खळबळ माजवण्यासाठी सज्ज आहेत.

Web Title: Mahindra to launch three brand new suvs in upcoming months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra

संबंधित बातम्या

‘सीडी १००’ दुचाकीचे हे फीचर्स ज्यामुळे ती बनली ८०-९० च्या दशकातील सर्वात फेमस बाईक? जाणून घ्या
1

‘सीडी १००’ दुचाकीचे हे फीचर्स ज्यामुळे ती बनली ८०-९० च्या दशकातील सर्वात फेमस बाईक? जाणून घ्या

सेकंड हँड वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय कसा सुरू करावा? महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या
2

सेकंड हँड वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय कसा सुरू करावा? महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या

पेट्रोल पंपावर ‘झिरो’ बघायला का सांगतात? ग्राहक आणि इंजिनच्या सुरक्षेचे रहस्य; जाणून घ्या एका क्लिकवर
3

पेट्रोल पंपावर ‘झिरो’ बघायला का सांगतात? ग्राहक आणि इंजिनच्या सुरक्षेचे रहस्य; जाणून घ्या एका क्लिकवर

भारतात पेट्रोल पंप कसा सुरू करावा? डीलरशिप मिळवण्याची प्रक्रिया, आवश्यक जमीन, खर्च आणि लागणारे परवाने
4

भारतात पेट्रोल पंप कसा सुरू करावा? डीलरशिप मिळवण्याची प्रक्रिया, आवश्यक जमीन, खर्च आणि लागणारे परवाने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.