
BYD Ti7 Faces European Sales Ban Over Design Dispute (फोटो सौजन्य-AI एआय)
चीनची कार कंपनी BYD हिला युरोपमध्ये मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. कंपनीची BYD Ti7 SUV ही लँड रोव्हर डिफेंडरच्या डिझाइनची नक्कल करत असल्याचा निर्णय नेदरलँड्समधील न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे BYD Ti7 च्या युरोपियन युनियनमधील विक्री, आयात आणि प्रोडक्शनवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर 2026 रोजी हे प्रकरण हेग येथील जिल्हा न्यायालयात निकाली काढण्यात आले.
डिफेंडरच्या डिझाइनशी साधर्म्य असल्याचा दावा
या प्रकरणाची सुरुवात जग्वार लँड रोव्हरने (JLR) केलेल्या कायदेशीर कारवाईमुळे झाली. बीवायडीने ब्रिटनमध्ये आपली 7-सीटर Ti7 SUV सादर करण्याची तयारी सुरू केल्यानंतर जेएलआरने डिझाइन हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. चीनमध्ये ही SUV कंपनीच्या फँगचेंगबाओ या सब-ब्रँडअंतर्गत Tai 7 नावाने विकली जाते.
जेएलआरच्या म्हणण्यानुसार, बीवायडी Ti7 मध्ये डिफेंडरची काही वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन वैशिष्ट्ये वापरण्यात आली आहेत. यामध्ये उंच आणि सरळ बॉडी, चौकोनी व्हील आर्च, बाजूच्या खिडक्यांची रचना आणि मागच्या दरवाज्यांनंतर दिसणारा खास बॉडी पॅनल यांचा समावेश आहे.
रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग सुरू! 2027 मध्ये भारतात होणार लाँच? पाहा काय आहेत डिटेल्स
न्यायालयाचा बीवायडीला दणका
न्यायालयाने दोन्ही SUV च्या बाह्य डिझाइनचा एकत्रित विचार केला. त्यानुसार या गाड्यांमधून एकसारखा लूक जाणवत असल्याचे न्यायालयाने मान्य केले. बीवायडीने हेडलॅम्प, ग्रिल, बोनेट आणि बंपर यांसारख्या भागांमध्ये फरक असल्याचे सांगितले होते. पण या बदलांमुळे दोन्ही गाड्यांमधील एकूण डिझाइनमधील साधर्म्य पुरेसे बदलत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
या आदेशानुसार युरोपियन युनियनमध्ये Ti7 ची आयात, निर्मिती, विक्री, विक्रीसाठी जाहिरात, साठवणूक आणि डिलिव्हरी करता येणार नाही. हंगेरीमध्ये उभारण्यात येणाऱ्या बीवायडीच्या नवीन कारखान्यातही या SUV चे प्रोडक्शन थांबवावे लागणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास 10 दशलक्ष युरोपर्यंत दंड होऊ शकतो.
रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग सुरू! 2027 मध्ये भारतात होणार लाँच? पाहा काय आहेत डिटेल्स
ब्रिटनमधील विक्रीला दिलासा
या बंदीचा ब्रिटनवर परिणाम होणार नाही. नेदरलँड्समधील न्यायालयाने बीवायडीच्या ब्रिटिश कंपनीवर अधिकार नसल्याचे सांगत ब्रिटनमधील बंदीची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे जानेवारी 2027 पासून सुरू होणाऱ्या नियोजित डिलिव्हरीला या आदेशामुळे अडथळा येणार नाही.
दरम्यान, बीवायडीने न्यायालयाच्या निर्णयाशी असहमती दर्शवली असून Ti7 स्वतंत्रपणे विकसित केल्याचा दावा केला आहे. कंपनी या निर्णयाविरोधात अपील करणार आहे. हा तात्पुरता मनाई आदेश असून संपूर्ण खटल्याचा निकाल नाही. जेएलआरला पुढील 6 महिन्यांत मुख्य खटला दाखल करावा लागणार आहे. तसे न झाल्यास हा आदेश रद्द होऊ शकतो.
Ans: लँड रोव्हर डिफेंडरच्या नोंदणीकृत डिझाइन हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप बीवायडीवर झाला. दोन्ही SUV च्या बाह्य डिझाइनमध्ये साधर्म्य असल्याचे नेदरलँड्सच्या न्यायालयाने मान्य केले.
Ans: होय. नेदरलँड्सच्या न्यायालयाचा आदेश ब्रिटनला लागू होत नाही. त्यामुळे जानेवारी 2027 पासून नियोजित डिलिव्हरी सुरू होण्याचा मार्ग मोकळा आहे.
Ans: होय. बीवायडीने Ti7 स्वतंत्रपणे विकसित केल्याचा दावा केला असून न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचे जाहीर केले आहे. हा सध्या तात्पुरता मनाई आदेश आहे.